बेळगाव लाईव्ह :बेळगाव खानापूर रोडवर देसूर जवळ झालेल्या अपघातात खानापूर तालुक्यातील करंबळ ग्रामपंचायतचे सदस्य उदय भोसले वय ४३ यांचा अपघाती मृत्यू झाला आहे. उदय हे खानापूर येथील कौंदल (ता. खानापूर) रहिवासी खानापूर भाजपचे सक्रिय सदस्य होते.
याबाबत समजलेल्या अधिक माहिती नुसार सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पणजी बेळगाव महामार्गावरील देसूर जवळ दुचाकी अपघातात मृत्यू झालाआहे.
पणजी बेळगाव महामार्गावरू जात असताना देसुर नजीक हायवे ब्रीजवर एका कारने ठोकरल्याने ते जागीच ठार झाले उदय यांच्या सोबत दुचाकीवर मागे बसलेले करंबळ गावचे भारतीय जवान प्रशांत पाटील हे जखमी झाले आहेत अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

उदय भोसले हे भाजपचे सक्रिय नेते ते गेल्या चार वर्षापासुन ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यानी गावच्या विकासात प्रगती साधली होती. त्याच्या सोबत असलेले भारतीय जवान प्रशांत पाटील (वय. ४१) याना तातडीने उपचारासाठी बेळगावला हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच आमदार विठ्ठल हलगेकर, भाजपचे नेते प्रमोद कोचेरी, गुंडू तोपिनकट्टी, मल्लापा मारीहाळ, भरमाणी पाटील, राजू सिध्दानी घटना स्थळी धाव घेतली होती.उदय भोसले यांच्या पश्चात पत्नी, मुले, बहिणी असा परिवार आहे त्यांच्या निधनाने गावावर शोककाळ पसरला आहे.