बेळगाव लाईव्ह : होळीच्या निमित्ताने शेतात पार्टी करायला गेलेल्या दोघांमध्ये वाद होऊन एकाने दुसऱ्यावर चाकू हल्ला केल्याची घटना बेळगाव शहराजवळील येळळूर जवळ घडली आहे.
बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील येळ्ळूर जवळ शेतात पार्टी करताना झालेल्या वादाचे पर्यवसान एकावर चाकू हल्ला होण्यामध्ये झाल्याची घटना आज शुक्रवारी घडली.
पोलिस उपायुक्तांनी सांगितलेल्या माहितीनुसार चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्याचे नांव प्रकाश चतुर रा. येळळूर असे आहे. पीडित आणि आरोपी दोघेही एकाच समुदायाचे असून एकमेकांना ओळखणारे हे दोघे आपल्या मित्रांसोबत शेतातील मोकळ्या जागेत रंगीत पार्टी करण्यासाठी गेले होते.
सर्वजण दारू पिऊन पार्टी करत असताना प्रकाश चतुर आणि आरोपीची दारूच्या नशेत वादावादी झाली. या वादाचे पर्यवसान आरोपीने प्रकाश याच्यावर चाकू हल्ला करण्यामध्ये झाले.