Wednesday, April 23, 2025

/

श्री रेणुका यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी १०० कोटींची तरतूद

 belgaum

बेळगाव लाईव्ह : केंद्र सरकारच्या प्रवासोद्योग विभागाच्या ‘डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमिक टुरिस्ट सेंटर टू ग्लोबल स्केल’ या योजनेअंतर्गत श्री रेणुका यल्लम्मा मंदिराच्या विकासासाठी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

श्री रेणुका यल्लम्मा देवी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच भक्तांसाठी मूलभूत सुविधा उभारण्यासाठी केंद्र सरकारने मोठी तरतूद केली आहे. ‘डेव्हलपमेंट ऑफ इकॉनॉमिक टुरिस्ट सेंटर टू ग्लोबल स्केल’ या योजनेच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

याच पार्श्वभूमीवर, मंदिराच्या विकासकामांसाठी प्रवासोद्योग विभागाचे अधिकारी व मंदिर प्रशासन मंडळाचे प्रतिनिधी यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत माजी मुख्यमंत्री व बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी विविध विषयांवर चर्चा केली.Renuka temple

मंदिराच्या पायाभूत सुविधांचा विकास, भक्तांसाठी दर्जेदार सोयी-सुविधा, तसेच पर्यटनवृद्धीला चालना देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर या बैठकीत विचारमंथन झाले. मंदिराच्या आधुनिक स्वरूपातील विकासासाठी प्रशासनाने योजनांची आखणी केली असून लवकरच या कामांना गती मिळणार असल्याचे खास. शेट्टर यांनी सांगितले.

श्री रेणुका यल्लम्मा मंदिर हे स्थानिक तसेच परराज्यातील भक्तांसाठी श्रद्धेचे केंद्र आहे. यामुळे मंदिराचा विकास केवळ धार्मिकदृष्ट्याच नव्हे, तर आर्थिक व पर्यटन विकासासाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर समाधान व्यक्त होत असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.