Thursday, December 5, 2024

/

शहराच्या सांडपाणी व्यवस्था प्रणालीसाठी निविदा जाहीर

 belgaum

बेळगाव लाईव्ह : एनजीटी पर्यावरण नुकसान भरपाई निधी आणि युएलबी निधी अंतर्गत बेळगाव शहरासाठी सांडपाणी व्यवस्था प्रणालीचे बांधकाम/अद्ययावतीकरण करण्यात येत असून यासाठी पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी कामकाज आणि देखभालीसाठी 362590177.1 रुपयांच्या निविदा बेळगाव शहर विकास प्राधिकरणातर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत.

शिवचरित्र शहापूर दक्षिण मतदारसंघ बेळगाव मध्ये 2116898.66 रुपयांच्या निधीतून मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे त्याचप्रमाणे न्यू गांधीनगर आणि उज्वल नगर बेळगाव उत्तर मतदारसंघात नाल्याचे प्रस्तावित बांधकाम – 49154467.71 रुपयांच्या निधीतून करणे, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील जय नगर आणि कुवेंपू नगरमधील जंक्शन आणि जोडलेले रस्ते सुधारण्यासाठी 38092426.11 रुपयांचा निधी, बेळगाव उत्तर मतदारसंघातील रामतीर्थ नगर येथे केईबी सबस्टेशनजवळ स्टॉर्म वॉटर ड्रेनची तरतूद आणि बांधकाम यासाठी 2063377.8 रुपयांचा निधी, रामतीर्थ नगर बेळगाव येथे 1384130.22 रुपयांच्या निधीतून विविध ठिकाणी टीसीचे स्थलांतर, बेळगाव उत्तर मतदारसंघातील मस्जिद ई अली ते अमन नगर लास्टक्रॉस पर्यंत स्टॉर्म वॉटर ड्रेनचे बांधकाम – 6457418.06 रुपयांच्या निधीतून करणे, माळमारुती पार्क बेळगाव उत्तर मतदारसंघातील फलोत्पादन आणि बोअरवेलच्या कामात सुधारणा करण्यासाठी 4712746.69रुपयांच्या निधीतून कामकाज करणे, विनायक नगर पार्क बेळगाव उत्तर मतदारसंघातील कट्टा आणि फलोत्पादनाच्या कामात सुधारणा यासाठी 7359895.43, सरस्वती कॉलनी, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील शिवालय मंदिराजवळ उद्यानाचा विकास यासाठी 4569949.95 रुपयांचा निधी, 51847067.97 रुपयांच्या निधीतून सह्याद्री नगर तलाव बेळगाव मध्ये पायाभूत सुविधा विकासाची कामे अशा निविदा जारी करण्यात आल्या आहेत.

याचप्रमाणे बेळगाव मनपा हद्दीतील मराठा मंदिर ते तिसरे रेल्वे गेट या मार्गावर असलेल्या डेकोरेटिव्ह पथदीप खांबाच्या जीर्णोद्धारासाठी दर निश्चितीच्या निविदा, बेळगाव शहर महानगरपालिका अंतर्गत प्रभाग क्रमांक 29 मधील हिंदवाडी, टिळकवाडी येथे विविध ठिकाणी लावण्यात येणाऱ्या एलईडी चिन्हांचे दर निश्चितीच्या निविदा, बेळगाव आयएसडब्ल्यूएम प्लांट तुरमुरी येथे कचऱ्याच्या पूर्व वर्गीकरणासाठी ट्रस वर्कसह शेडचे बांधकाम यासाठी 66836999.99 रुपयांचा निधी, विद्यमान विंडो प्लॅटफॉर्मसाठी आरडीएफ स्टोरेज युनिट, कंपोस्ट स्टोरेज युनिट आणि आंशिक ट्रसचे बांधकाम यासाठी 72176942.1 रुपयांचा निधी, बेळगाव सिटी कॉर्पोरेशनमधील आयएसडब्ल्यूएम प्लांट, तुरमुरी येथे 109 टीपीडी क्षमता मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी शेडचे बांधकाम यासाठी 85500000 रुपयांचा निधी, मनपा हद्दीतील बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी उद्यान परिसरातील ब्लॅकस्पॉट्सवर पथदिवे बसवण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी 265000 रुपयांचा निधी, गोगटे सर्कल ते मराठा मंदिर येथील खराब झालेले पथदीप खांब आणि पथदीप केबल बदलण्यासाठी 430000 रुपयांचा निधी, प्रभाग क्रमांक 13 मधील वीरभद्र नगर झिरो क्रॉस, 3रा क्रॉस आणि अहमद नगर 3रा क्रॉस येथे पथदीप खांब आणि केबल पुरवठा आणि फिक्सिंगसाठी 250000 रुपयांचा निधी, गजानन महाराज नगर येथे पथदिवे बसविण्यासाठी आवश्यक व्यवस्था करण्यासाठी 180000 रुपयांचा निधी, प्रभाग क्रमांक 32 मधील मुंगर्डेकर कॉलनी, बसवेश्वर नगर, मुरलीधर कॉलनी येथे पथदिव्यांच्या खांब आणि लाईनचा पुरवठा व दुरुस्ती यासाठी 350000 रुपयांचा निधी, सिंधी कॉलनी, गणेश नगर, शिवागिरी कॉलनी आणि भंजरा कॉलनी येथील वॉर्ड क्रमांक 31 येथे पथदीप खांब आणि केबल पुरवठा आणि फिक्सिंगसाठी 50000 रुपयांचा निधी, प्रभाग क्रमांक 33 मधील एपीएमसी मुख्य रस्त्यावरील स्ट्रीट लाईट लाईन पोलचा पुरवठा आणि दुरुस्ती यासाठी 235000 रुपयांचा निधी, बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सह्याद्री नगर क्रमांक 47 मधील जंक्शन आणि जोडलेले रस्ते यासाठी 49051462.11रुपयांचा निधी, बेळगाव शहर महानगरपालिकेच्या दक्षिण विभागांतर्गत स्मशानभूमीतील चिता दहनाची सुधारणा यासाठी 2161000 रुपयांचा निधी, प्रभाग क्र.28, मधील शहापूर स्मशानभूमीत सुधारणा करण्यासाठी 3170000 रुपयांचा निधी, बेळगाव उत्तर मतदारसंघातील रामतीर्थनगर बेळगाव येथे शादी महलाच्या शिल्लक बांधकामासाठी 8941748.93 रुपयांचा निधी, उत्तर मतदारसंघातील विविध ठिकाणी बोअरवेल खोदण्यासाठी 32000000 रुपयांचा निधी, सैनिक नगर मध्ये रस्ता, नाले आणि इतर मूलभूत सुविधांसाठी 27999999.99 रुपयांचा अशा एकूण 362590177.1 रुपयांच्या निविदा बेळगाव शहर विकास प्राधिकरणातर्फे जाहीर करण्यात आल्या आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.