बेळगाव लाईव्ह : कौटुंबिक कलहातून निर्माण झालेल्या मानसिक तणावातून चिक्कोडी येथील एका महिलेने आपल्या १७ महिन्यांच्या बाळासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे.
गायत्री वाघमोरे (26) आणि कुशल वाघमोरे (१७ महिने) (रा. मांगनूर, ता. चिक्कोडी) अशी दुर्दैवी मृतांची नावे आहेत.
कौटुंबिक कलहातून झालेल्या भांडणामुळे सदर महिलेने टोकाचा निर्णय घेत आपले जीवन संपविल्याचे प्राथमिक तपासात समोर आले असून घटनेबाबत अदयाप अधिक माहिती उपलब्ध झाली नाही.
चिक्कोडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. मृतदेह शवविच्छेदनासाठी चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयात पाठविण्यात आला असून या घटनेची चिक्कोडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.