Thursday, October 10, 2024

/

इस्कॉनतर्फे आजपासून भगवद् गीता अभ्यासवर्ग

 belgaum

बेळगाव लाईव्ह:शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉनतर्फे आज शुक्रवार 20 सप्टेंबरपासून येत्या गुरुवार दि. 26 सप्टेंबर 2024 पर्यंत सलग सात दिवसांच्या भगवद् गीता अभ्यासवर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार पेठ, टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरामध्ये (इस्कॉन) मराठी, कन्नड आणि हिंदी अशा तीन भाषांमध्ये आजपासून 26 सप्टेंबरपर्यंत दररोज सायंकाळी 6:30 ते 8:30 वाजेपर्यंत हा अभ्यासवर्ग चालणार आहे. याखेरीज इंग्रजीमध्ये झूम ऑनलाईन माध्यमाद्वारे देखील भगवद् गीतेचा हा अभ्यासवर्ग घेतला जाणार आहे. सदर अभ्यास वर्गामध्ये भगवद् गीता काय आहे? सुखाचा शोध मनुष्य जीवनाचे महत्त्व, शास्त्र भगवंतांचे वचन आहे का? भगवंत कोण आहेत? मी कोण आहे? आत्मा काय आहे? पुनर्जन्म एक कल्पना आहे की वास्तविकता? चांगल्या लोकांच्या बरोबर वाईट का होते? सर्वोत्तम योग कोणता? व्यवहारिक जीवनामध्ये भगवद् गीतेचा उपयोग याबाबतचे विवेचन व मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रवचन, स्लाईड शो, व्हिडिओ, प्रश्नोत्तर, महाप्रसाद असे या भगवद् गीता अभ्यासवर्गाचे स्वरूप असणार आहे. तरी नागरिकांनी बहुसंख्येने या अभ्यासवर्गाचा लाभ घ्यावा. तसेच अधिक माहितीसाठी 9036690678 किंवा 7264001247 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन इस्कॉन बेळगावतर्फे करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.