Thursday, October 10, 2024

/

राजदूतांना दिल्या श्री गणेश मूर्ती आणि उकडीचे मोदक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली येथील कार्यालयात बेळगावचा अभिषेक जाधव हा युवक जनसंपर्क अधिकारी म्हणून काम पाहात असून अभिषेक जाधवच्या माध्यमातून बेळगावचे प्रतिनिधित्व दिल्लीच्या दरबारी होत आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला नवी दिल्लीतील विविध देशांच्या दूतावासात राजदूतांना गणेशोत्सवानिमित गणेशमूर्ती आणि उकडीचे मोदक भेट देण्यात आले.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीने नवी दिल्लीत विविध देशांच्या राजदूतांना बेळगावच्या युवकांनी भेट दिल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचे दिल्लीस्थित जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांनी विविध देशांच्या दूतावासांना प्रतिकात्मक श्रीगणेशाची मूर्ती भेट दिली. अनेक देशाच्या राजदूतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राचे आभार मानले आहेत.Abhishek jadhav

गणेश चतुर्थी आणि गणेशोत्सव महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे. विविध देशांचे सर्वोच्च प्रतिनिधी म्हणून सर्व देशांचे राजदूत नवी दिल्लीत कार्यरत असतात. गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीचे प्रतिनिधित्व करणारे उकडीचे मोदक आणि श्रीगणेशाची मूर्ती अशी भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वतीने विविध देशांच्या राजदूतांना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे दिल्लीस्थित जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांनी विविध देशांच्या राजदूतांची भेट घेतली. एकमेकांच्या संस्कृतीची देवाणघेवाण व्हावी, महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख साऱ्या जगाला व्हावी म्हणून हा उपक्रम केल्याचे समजते.

डेन्मार्कचे राजदूत फ्रेडी स्वेन, मेक्सिकोचे राजदूत फेडेरिको सेलस, कुवेतचे राजदूत मेशाल मुस्तफा अलशेमाली, लॅटव्हियाचे राजदूत ज्युरीस बोन, लिथुआनियाच्या राजदूत डायना मिकेव्हीसीएनी यांनी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महाराष्ट्राच्या जनतेप्रती आभार व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त केले आहेत. तसेच अन्य सर्व राजदूतांनी मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अभिषेक जाधव यांच्याजवळ आभारसंवेदना प्रकट केल्या आहेत.Ganesh advt 2024

याबाबत अभिषेक जाधव म्हणतात, गणेशोत्सव हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचे ठळकपणे प्रतिनिधित्व करणारा सण आहे. अखिल भारताला सार्वजनिक गणेशोत्सवाची देण महाराष्ट्राने दिली. देशाच्या स्वातंत्र्यालढ्यात तसेच जडणघडणीतही गणेशोत्सवाची भूमिका महत्वाची होती. महाराष्ट्र राज्यात गुंतवणूक, उद्योग आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध देशाच्या राजदूतांना महाराष्ट्राच्या उत्साही आणि सकारात्मक उत्सवी संस्कृतीची ओळख व्हावी या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला.Ganesh advt 2024

सर्व देशांच्या प्रतिनिधींनी अतिशय सकारात्मक भावना व्यक्त केल्या आणि महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे आभार मानले आहेत. तसेच महाराष्ट्राच्या तमाम जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक जाधव हे केळकर बाग येथील रहिवाशी असून महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते दत्ता जाधव यांचे सुपुत्र आहेत.Ganesh advt 2024

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.