Tuesday, September 17, 2024

/

एनडीआरएफ दलाची बोट उलटली : सुदैवाने अनर्थ टळला

 belgaum

बेळगाव लाईव्ह : अतिवृष्टीमुळे कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे बेळगाव-रायबाग कुडची पूल पाण्याखाली गेला असून या भागात हेस्कॉमचे कर्मचारी आणि इतर कर्मचारी एनडीआरएफ पथकासह या पुलाच्या शेजारी असलेल्या जॅकवेलच्या दुरुस्तीसाठी बोटीतून जात होते.

दरम्यान कृष्णा नदीत एनडीआरएफची बोट उलटल्याने गोंधळ उडाला. बोट उलटल्यानंतर लाईनमन आणि वॉटरमन या दोघांनी नदीकाठावरील झाडाला धरून आपला जीव वाचवला. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून,लाईफ जॅकेटमुळे सर्वजण सुरक्षित बचावले आहेत.

गुरुवारी सकाळी हा प्रकार घडला आहे. मुसळधार पावसामुळे सध्या कृष्णा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले असून ती दुथडी वरून वाहत आहे. त्यामुळे गावांना पाणीपुरवठा करणारी जॅकवेल खराब झाली आहे.Ndrf

सदर जॅकवेल दुरुस्त करण्यासाठी आज सकाळी हेस्कॉमचे स्थानिक लाईनमन आणि पाणी पुरवठा मंडळाचे वॉटरमन एनडीआरएफ पथकाच्या बोटीतून निघाले होते. दुधडी भरलेल्या नदीतून जॅकवेलच्या दिशेने जात असताना सदर बोट अचानक उलटली.

त्यामुळे एकच गोंधळ उडाला. मात्र बोटीतील प्रत्येकाने लाईफ जॅकेट घातले असल्यामुळे सर्वजण सुरक्षित राहिले. एनडीआरएफच्या उलटलेल्या बोटीमध्ये एकूण 6 जण होते.

बोट उलटताच काठावरील दुसऱ्या बोटीच्या सहाय्याने एनडीआरएफ जवानांनी तात्काळ मदतकार्य हाती घेऊन नदीपात्रात पडलेल्या सहाही जणांचा जीव वाचवला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.