बेळगाव लाईव्ह :सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने फी सवलत जाहीर केली असून शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा आहे, अशा अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा येत्या बुधवार दि. 29 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आली आहे, याची सीमाभागातील इच्छुक विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन मध्यवर्तीय महाराष्ट्र एकीकरण समिती बेळगावचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.
गेल्या 2022 -23 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमाभागातील एकूण 865 गावातील जे विद्यार्थी कोल्हापूर महाराष्ट्र येथील शिवाजी विद्यापीठांमध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी विद्यापीठाने फी सवलत जाहीर केली आहे. यामध्ये अनुदानित अभ्यासक्रमासाठी संपूर्ण ट्युशन फी व विनाअनुदानित अभ्यासक्रमासाठी 25 टक्के ट्युशन फी माफ करण्यात आली आहे.
जे विद्यार्थी वस्तीगृहासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्याकरिता वस्तीगृहाची फी माफ करण्यात आली आहे. शैक्षणिक वर्ष 2026 -27 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा आहे अशा अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा येत्या बुधवारी 29 एप्रिल रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित करण्यात आली आली आहे.
सीमाभागातील विद्यार्थ्यांनी https://www.unishivaji.ac.in/mscadmission / studentinformation या संदर्भातील सविस्तर तपशील करून इच्छुक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा व नजीकच्या काळात कार्यशाळा लवकरच बेळगाव येथे आयोजित केली जाणार आहे.
या संधीचा देखी लाभ सीमावासीय विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने केले आहे.




