Wednesday, September 11, 2024

/

61 गावे स्थलांतरित खानापूर समितीची बैठक

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कस्तुरीरंगन अहवालानुसार केंद्र सरकारने खानापूर तालुक्यातील 61 गावे अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली असून केंद्र सरकार सदर गावे स्थलांतरीत करण्याचा विचार करीत आहे. तसा मसुदा अधिसूचना जारी करण्यात आली असून त्यावर 60 दिवसात सूचना व हरकती मागविण्यात आल्या आहेत.

त्यासंदर्भात विचार विनिमय करण्यासाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने बुधवार दिनांक 7 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 11 वाजता शिवस्मारक येथे महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे.

या बैठकीला खानापूर तालुक्यातील बैलूर, चिगुळे, बेटगेरी, मोरब, हुळंद, कणकुंबी, गोल्याळी, उचवडे, चोर्ला, बेटणे, जांबोटी, कालमणी, पारवाड, गवसे, चापोली, चिखले, दारोळी, कापोली, मुगवडे, आमगाव, कबनाळी, अल्लोळी, कान्सुली, कवळे, गवाळी, नेरसे, पास्तोली, कोंगळा, मणतुर्गा, खानापूर ग्रामीण, होल्डा, तेरगाळी, जामगाव, अबनाळी, शिरोळी, केळील, डोंगरगाव, मेंडील, देगाव, पडलवाडी, हेम्माडगा, आंबेवाडी,

कामतगा, किरवळे के. जी., वरखडपाटे, घोसे, मोहिशेत, घोटगाळी, शिंदोळी बी. के., सातनाळी, आकराळी, बस्तवाड, कोडगई, सुळेगाली, मुंदवाड, नागरगाळी, तारवाड, चिंचेवाडी, सुवातवाडी, कुंभार्डा आदी गावातील नागरिकांनी तसेच खानापूर तालुक्यातील समिती कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन समिती अध्यक्ष गोपाळराव देसाई आणि सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.