Saturday, September 7, 2024

/

खानापूर म. ए. समितीच्यावतीने जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बदली करुन घेतलेल्या शिक्षकांच्या जागी नवीन शिक्षक किंवा अतिथी शिक्षकांची नेमणूक केल्याशिवाय शिक्षकांना बदली झालेल्या ठिकाणी सोडू नये तसेच खानापूर तालुक्यातील मराठी शाळांचा पदभार मराठी विषयांच्या शिक्षकांकडे देण्यात यावा अशी मागणी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने जिल्हा शिक्षणाधिकारी मोहनकुमार हंचाटे यांच्या कडे करण्यात आली आहे.

खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सर चिटणीस आबासाहेब दळवी, गोपाळ पाटील, निरंजन सरदेसाई, अरविंद शेलार गणपती पाटील यांनी गुरुवारी जिल्हा शिक्षणाधिकारी हंचाटे यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.

खानापूर तालुक्यामध्ये शिक्षकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. तसेच अनेक शाळांचा भार अतिथी शिक्षकांवर आहे. त्यामुळे अनेक शाळाना अडचणीचा सामना करावा लागत असून गेल्या काही दिवसांपासून शिक्षण खात्याने शिक्षकांच्या बदलीसाठी कौन्सिलिंग घेतले आहे.

त्यामुळे तालुक्याच्या पश्चिम भागासह अनेक भागातील शिक्षकांनी दुसऱ्या ठिकाणी बदली करून घेतली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शाळासमोर मोठे संकट निर्माण होणार आहे. त्यामुळे ज्या शाळांमधील शिक्षकांनी बदली करून घेतली आहे.

त्या शाळेत नवीन शिक्षकाची नेमणूक करावी किंवा त्या ठिकाणी लवकर अतिथी शिक्षकाची नेमणूक करावी आणि त्यानंतरच शिक्षकांना दुसऱ्या शाळेत जाण्याची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच अनेक मराठी शाळांमध्ये कन्नड शिक्षकांवर मुख्याध्यापक पदाचा कारभार सोपवण्यात आला आहे.Khanapur mes

अशा ठिकाणी पुन्हा मराठी शिक्षकांवर शाळेची धुरा देण्यात यावी. यासह पावसामुळे अनेक शाळांमध्ये पाणी गळती होत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण होत आहे. त्यामुळे शिक्षण खात्याने पाणी गळती होत असलेल्या शाळांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची दखल घ्यावी अशी मागणी समितीतर्फे करण्यात आली.

यावेळी जिल्हा शिक्षणाधिकारी हंचाटे यांनी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याकडे लक्ष दिले जाईल असे आश्वासन दिले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.