Friday, September 20, 2024

/

… सगळेच पोलीस कांही माणुसकी हरवलेले नसतात

 belgaum

बेळगाव लाईव्ह :हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिये वेळी तातडीने रक्ताची गरज असलेल्या रुग्णाच्या मदतीला धावून जात शहर पोलीस उपायुक्तांचे गनमॅन अजित शहापुरी आज रक्तदान करून मानवतावादी कार्य केले.

केएलई हॉस्पिटलमध्ये उद्या श्रीमंत पाटील या रुग्णावर ऑन्कोलॉजी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी तातडीने रक्ताची गरज असल्यामुळे आवाहन करण्यात आले होते.

या वाहनाला तात्काळ प्रतिसाद देत शहर पोलीस उपायुक्त पी व्ही स्नेहा यांचे गनमॅन असलेल्या अजित शहापुरी यांनी आज सोमवारी सकाळी तात्काळ हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन रक्तदान केले.Police blood donation

या पद्धतीने रक्तदान करून श्रीमंत पाटील यांचा जीव वाचवण्यास मदत केल्याबद्दल रक्तदान केल्याबद्दल पाटील कुटुंबीयांसह फेसबुक फ्रेंड्स सर्कलने गनमॅन शहापुरी यांचे शतशः आभार मानले आहेत.

रक्तदान करून गनमॅन पोलीस अजित शहापुरी यांनी सगळेच पोलीस कांही निष्ठूर, माणुसकी हरवलेले नसतात हे जणू दाखवून दिले, एवढे मात्र निश्चित आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.