Monday, July 15, 2024

/

प्रमोद मुतालिकांची ‘त्या’ प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया..

 belgaum

बेळगाव लाईव्ह : विविध गुन्ह्यांखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत बेळगावमधील हिंडलगा कारागृहात बंधनात असलेल्या जयेश पुजारी उर्फ कांता या आरोपीने बेळगाव न्यायालय आवारात खटल्यादरम्यान पाकिस्तान जिंदाबादची घोषणा दिली. आज दिवसभरात बेळगावसह राज्यभरात या प्रकरणाची चर्चा सुरु असून श्रीराम सेना अध्यक्ष प्रमोद मुतालिक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

‘पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देणाऱ्याला गोळी घालून ठार करा’ असे वक्तव्य करत काँग्रेसवरदेखील त्यांनी ताशेरे ओढले आहेत.

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर चिक्कोडी लोकसभा मतदार संघातील काँग्रेसच्या विजयी उमेदवाराच्या विजयोत्सवादरम्यान पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या.

याबाबत काँग्रेसने विचार करायला हवा, असे प्रमोद मुतालिक म्हणाले. यावेळी पाकिस्तानवरदेखील त्यांनी संताप व्यक्त करत पाकिस्तानची अवस्था मूलभूत गरजांशिवाय भिकाऱ्यासारखी झाल्याचेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.