Sunday, September 1, 2024

/

…राष्ट्र रक्षक, धर्म रक्षक मराठाच

 belgaum

बेळगाव लाईव्ह :नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतून बेळगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या जगदीश शेट्टर यांना विजयी करण्यात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या मराठी भाषिक मतदारांनी मराठ्यांना हिंदुत्व शिकवणाऱ्यांना चांगली चपराक दिली आहे.

तेंव्हा निवडून आलेल्या खासदारांनी भविष्यात जात-पातीचा भेदभाव न करता केवळ हिंदुत्व आणि राष्ट्र प्रथम या मुद्द्यावर मतदान केलेल्या मराठ्यांचा विचार नक्कीच करावा, अशी अपेक्षा कंग्राळी खुर्द येथील रहिवासी प्रशांत गोपाळ पाटील यांनी व्यक्त केली आहे.

नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीतून बेळगाव लोकसभा मतदारसंघातून जगदीश शेट्टर हे 1 लाख 77 हजार मताधिक्याने विजयी झाले. या निवडणुकीत मराठी मते ही खूप निर्णायक ठरली. मराठी मतदारांचा कौल ज्या पक्षाकडे जातो त्या पक्षाचा खासदार हा निर्विवाद पणे निवडून येतो हे आजवरचे सत्य आहे.

याचा अनुभव निवडून आलेल्या भाजप पक्षाला यावेळी पुन्हा एकदा आला. मागील वेळी महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला उमेदवार दिला होता. त्यामुळे राष्ट्रीय पक्षांची चांगलीच दमछाक झाली होती. तथापी यावेळी मात्र राष्ट्र प्रथम या तत्त्वावर सीमा भागातील तिन्ही मतदार संघातील मराठ्यांनी आपली अमूल्य मते ही सक्षम आणि सुरक्षित हिंदुस्तान बनविण्यासाठी कोणत्याही लोभाला बळी न पडता नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर दिली. त्यामुळेच बेळगाव आणि कारवार लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आला. आज पुन्हा एकदा सिद्ध झालं की राष्ट्रभक्ती आणि धर्मभक्ती ही मराठ्यांच्या नसानसातच आहे. मराठ्यांच्या मतामुळेच आज आपण निवडून आलो असे उद्गार देखील भारतीय जनता पक्षाचे नेते  महांतेश कवठगीमठ यांनी काढले.Prashant

यांनी काढलेल्या या उद्गारामुळे मराठ्यांना हिंदुत्व शिकवणाऱ्याना चांगलीच चपराक बसली आहे. आता निवडून आलेल्या खासदारांनी भविष्यात जातीपातीचा विचार न करता केवळ हिंदुत्व आणि राष्ट्र प्रथम या मुद्द्यावर मतदान केलेल्या मराठ्यांचा विचार नक्कीच करावा हिच अपेक्षा, असे मत कंग्राळी खुर्द येथील प्रशांत गोपाळ पाटील यांनी व्यक्त केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.