Sunday, June 16, 2024

/

शहरात 8 वन-वे; नियम तोडल्यास थेट कारवाई

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव शहरातील वाहन चालकांना आता वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार असून एकेरी मार्गावर (वन-वे) नियम तोडून विरुद्ध दिशेने वाहन चालवणाऱ्यांवर थेट पोलीस कारवाई केली जाणार आहे.

पोलीस आयुक्तांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रका नुसार शहरातील 8 एकेरी मार्गावरील वाहतुकीबाबत सूचना करण्यात आली आहे. शहरात एकेरी मार्गावरील वाहतूक नियम पालन केले जात नसून विरुद्ध दिशेने देखील वाहनचालक आपली वाहने या रस्त्यावरून हाकत आहेत.

ज्यामुळे अपघाताचा धोका वाढण्याबरोबरच वाहतूक कोंडीचा त्रास होत असून त्याचा शहराच्या वाहतुकीवर परिणाम होत आहे. त्यामुळे शहरातील एकेरी मार्गावरील वाहतुकीवर तातडीने कार्यवाही करण्याची सूचना वाहतूक पोलिसांना देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील 8 एकेरी मार्गांवर यापुढे विरुद्ध दिशेने संचार करणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे.One way

 belgaum

शहरातील आठ एकेरी मार्ग (वन-वे) पुढील प्रमाणे आहेत. 1) किर्लोस्कर रोड (धर्मवीर संभाजी महाराज चौकापासून कडोलकर गल्लीच्या दिशेने), 2) केळकर बाग (श्री दत्त मंदिरापासून रामदेव गल्लीच्या दिशेने), 3) अनसुरकर गल्ली (रामलिंग खिंड गल्ली पासून मारुती गल्ली कॉर्नरच्या दिशेने),

4) रामदेव गल्ली (हुतात्मा चौकापासून संयुक्त महाराष्ट्र चौकाच्या दिशेने), 5) गणपत गल्ली (मारुती गल्लीपासून काकती वेसच्या दिशेने), 6) कलमठ रोड (फोर्ट रोडपासून रविवार पेठच्या दिशेने), 7) नेहरूनगर सेकंड क्रॉस (तट्टे इडली कॉर्नर), 8) नेहरूनगर थर्ड क्रॉस (मुजावर आर्केड).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.