बेळगाव लाईव्ह :कंग्राळी खुर्द येथील अवघ्या 4 वर्षाच्या निरागस बालिकेचा तिच्या सावत्र आईने खून केल्याचा गंभीर आरोप मयत बालिकेच्या नातलगांनी केल्याची घटना आज घडली आहे.
मयत बालिकेचे नाव समृद्धी रायण्णा नावी (वय 4) असे आहे. समृद्धी आज सुमारे सकाळी सातच्या सुमारास घरामध्ये खेळत असताना अचानक खाली कोसळली. तेंव्हा बरे वाटत नसेल म्हणून उपचारासाठी तिला तातडीने बीम्स हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना दुर्दैवाने वाटेतच तिचा मृत्यू झाला होता.
समृद्धीच्या मृत्यूची बातमी मिळताच तिच्या आजा, आजी, व अन्य नातलगांनी बीम्स हॉस्पिटलकडे धाव घेतली. तसेच सदर शोकाकुल नातलगांनी समृद्धीच्या मृत्यू तिची सावत्र आई सपना रायण्णा नावी कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप केला. दोन वर्षांपूर्वी 2021 मध्ये हुंड्यासाठी समृद्धीची आई भारती हिचा खून झाला होता.
आता सावत्र आई सपना हिने 4 वर्षाच्या समृद्धीचा खून केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मयत समृद्धीच्या एका नातलगाने तिला काल रात्री उलटी आणि शौचाला झाले होते.
त्यानंतर आज सकाळी बरे वाटू लागल्याने घरात खेळत असताना ती अचानक खाली कोसळली आणि उपचारासाठी हॉस्पिटलला नेत असताना तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले.