Sunday, May 26, 2024

/

मराठा मंदिर येथे डॉ. निरगुडकर यांचे १० रोजी व्याख्यान

 belgaum

बेळगाव लाईव्ह : ख्यातनाम संपादक आणि आयटी क्षेत्रातील प्रमुख अधिकारी, प्रेरणादायी वक्ते डॉ. उदय निरगुडकर यांचे १० एप्रिल रोजी मराठा मंदिर येथे सायंकाळी ५.३० वाजता व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.

‘२०४७ चा भारत’ हा त्यांचा व्याख्यानाचा विषय असून हा कार्यक्रम येथील लोकमान्य ग्रंथालय, वरेरकर नाट्य संघ, वाड्म़य चर्चा मंडळ आणि सरस्वती वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे .

झी २४ तास, न्युज १८ लोकमत या वृत्तवाहिन्यांचे तसेच डीएनए या वृत्तपत्राचे संपादक असलेले डॉ. निरगुडकर हे अनेक आयटी कंपनीमधून सीईओ या पदावर कार्यरत होते.

 belgaum

Uday nirgudkar

एक संशोधक, शिक्षण तज्ज्ञ , अर्थ तज्ज्ञ आणि शास्त्रीय संगीताचे जाणकार मुलाखतकार म्हणून त्यांची वाणी अतिशय प्रेरणादायी, विद्यार्थ्यांना घडविणारी आहे.

त्यांनी रंगविलेले भारताचे पुढील पंचवीस वर्षांचे चित्र तरुणांना मार्गदर्शक ठरणारे आहे. सदर कार्यक्रम सर्वासाठी खुला असून बेळगावकरांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.