Saturday, April 27, 2024

/

सिकंदर शेख बनला बेळगाव केसरी!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव बेळगाव केसरीचा मान सिकंदर शेख यांनी मिळविला येथील आनंदवाडी आखाड्यात आज सायंकाळी संपन्न झालेल्या बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निकाली कुस्त्यांच्या जंगी मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने पंजाबच्या गुरुजीत सिंग या पैलवानाला केवळ 2 मिनिटात एकलांगी डावावर आस्मान दाखवित मानाचा बेळगाव केसरी किताब पटकावित उपस्थित हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यांचे.पारणे फेडले.

बेळगाव हिंदवाडी येथील आनंदवाडी कुस्ती आखाड्यात आज 90 हून अधिक कुस्त्या झाल्या त्यामधील पहिल्या क्रमांकाची कुस्ती ही महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व गुरुजीत पंजाब यांच्यामध्ये झाली महाराष्ट्र केसरी असलेल्या सिकंदर शेख याने केवळ 2 मिनिटात गुरुजीत सिंगला एकलांगी डावावर आस्मान दाखवित बेळगाव केसरीवर आपले नाव कोरले.

दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत इराणच्या महंदीला आंतरराष्ट्रीय घुटना डावावर चित करित माऊली कोकाटे यांनी विजय संपादन केला.Sikadar Shaikh

 belgaum

तर तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत इराणच्या हादी पैलवानाने उप महाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर यांला बॅकथ्रो डावावर हरवत विजय मिळवला तर नेपाळच्या देवा थापाने मनोरंजन कुस्तीत पैलवान समशेर सिंह याचा निकाली डावावर चित केले करीत उपस्थितांची मने जिंकली.

हजारो कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत अनेक चटकदार कुस्त्या पाहायला मिळाल्या बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या वतीने आनंदवाडी दंगल चे आयोजन करण्यात आले होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.