Saturday, April 27, 2024

/

दुचाकी चोरटा गजाआड; 4 दुचाकी वाहने जप्त

 belgaum

बेळगाव लाईव्ह :शहरातील सदाशिवनगर आणि खडेबाजार येथील मोटरसायकल चोरी प्रकरणी एपीएमसी पोलिसांनी एका चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडील एक लाख 35 हजार रुपये किमतीच्या चार दुचाकी वाहने जप्त केली आहेत.

पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नांव संजू मल्लाप्पा मेकली (वय 24, रा. बेनकनहोळी ता. हुक्केरी) असे आहे.

या आरोपीकडून पोलिसांनी तीन हिरो होंडा स्प्लेंडर आणि एक डिओ स्कूटर अशी चोरीला गेलेली एकूण 1 लाख 35 हजार रुपये किमतीची चार दुचाकी वाहने जप्त केली आहेत.Police

 belgaum

याप्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सुरू आहे.

उपरोक्त आरोपीला अटक करून चोरीची दुचाकी वाहने जप्त केल्याबद्दल एपीएमसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचाऱ्यांना बेळगावचे पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांनी शाबासकी दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.