Saturday, July 27, 2024

/

छ. शिवाजीनगर येथे 21 रोजी श्री होळी कामान्ना मंदिराचे उद्घाटन

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील श्री छत्रपती शिवाजीनगर पाचवी गल्ली येथील श्री होळी कामान्ना ट्रस्टतर्फे येत्या सोमवार दि. 19 आणि बुधवार दि. 21 फेब्रुवारी 2024 रोजी श्री होळी कामान्ना मंदिर वास्तुशांती तसेच श्री होळी कामान्ना मंदिर प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा अर्थात उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

छ. शिवाजीनगर पाचवी, सहावी व सातवी गल्ली परिसरातील जीर्णोद्धार करण्यात आलेल्या श्री होळी कामान्ना मंदिराचा वास्तुशांती समारंभ सोमवारी 19 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या दिवशी सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत मंदिर वास्तू कार्यक्रम होईल. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता कलश मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर मिरवणुकीत गल्लीतील सर्व महिला मंगल कलश घेऊन सहभागी होणार आहेत. श्री होळी कामान्ना मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना व कळसारोहण सोहळा बुधवारी 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 ते 11.30 वाजेपर्यंत विधिवत संपन्न होईल.Shivaji mandolkar

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय गुरुवर्य श्री संभाजीराव विनायकराव भिडे गुरुजी उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते मंदिराचे कळसारोहण होणार आहे.

सदर कार्यक्रमानंतर दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी छ. शिवाजीनगर व शहरातील सर्व भाविकांनी सदर कार्यक्रमाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन श्री होळी कामान्ना मंदिर जिर्णोद्धार कमिटीचे अध्यक्ष नगरसेवक शिवाजीराव पुंडलिक मंडोळकर, श्री होळी कामांना ट्रस्ट कमिटी व गल्लीतील पंचमंडळींनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.