Tuesday, July 23, 2024

/

गुंफण साहित्य संमेलनात सीमा प्रश्नाचा ठराव

 belgaum

बेळगाव लाईव्ह: सीमा भागातील मराठी भाषिकांच्या भावनांचा आदर करून हा सीमा भाग महाराष्ट्रात सामील करावा. त्याचप्रमाणे सीमा भागात होणारी मराठीची गळचेपी थांबवावी असा महत्त्वपूर्ण ठराव एकोणिसाव्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात टाळ्यांच्या कडकडाटात करण्यात आले.

राजवीर पब्लिक स्कूल (वाशी, ता. करवीर) व गुंफण अकादमी (मसूर, जि. सातारा) यांच्या संयुक्त विद्यमाने वाशी येथे राजवीर पब्लिक स्कूलच्या प्रांगणात हे दोन दिवसीय साहित्य संमेलन अपूर्व उत्साहात साजरे झाले. प्रसिद्ध साहित्यिक डॉ. राजेंद्र माने हे या संमेलनाचे अध्यक्ष होते तर साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक कृष्णात खोत संमेलनाचे उद्घाटक होते.

लोककलावंतांचा लोकजागर, ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेचे लेखक प्रताप गंगावणे यांची प्रकट मुलाखत, महिला सक्षमीकरण विषयावरील परिसंवाद, निमंत्रितांचे कवी संमेलन त्याचप्रमाणे गुंफण पुरस्कार व प्रेमलाताई चव्हाण स्मृती राज्यस्तरीय विनोदी कथा स्पर्धेचे पारितोषिक वितरण अशा भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी या संमेलनाच्या निमित्ताने परिसरातील साहित्य रसिकांना मिळाली.Gunfan

संमेलनाच्या समारोप सत्रात सीमा भाग महाराष्ट्रात सामील करावा, सीमा भागात होणारी मराठी भाषेची गळचेपी थांबवावी त्याचप्रमाणे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा असे ठराव टाळ्यांच्या कडकडाटात करण्यात आले.

संमेलनास स्वागताध्यक्ष बी‌. ए. पाटील, अकादमीचे अध्यक्ष डॉ. बसवेश्वर चेणगे, माजी आमदार संपतराव पवार – पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक सलीम मुल्ला, प्राचार्य डॉ. जे. के. पवार, प्रसिद्ध ग्रामीण कथाकार बबन पोतदार, प्राचार्य राजेखान शानेदिवाण, भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. शिवाजीराव पाटील, कवी प्रा. चंद्रकांत पोतदार, गोवा मराठी अकादमीच्या सासष्टी विभागाचे अध्यक्ष अरुण रायकर, मल्हार सेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, अनिता पाटील, वैष्णवी सरनोबत आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.