Saturday, July 27, 2024

/

बेटणे नजीक वाळू टिप्पर पलटी, चालक ठार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : जांबोटी ते कणकुंबी दरम्यान राज्यमार्गावर रस्त्यावरील खड्डा चुकवताना चालकाचे नियंत्रण चुकल्याने वाळू भरून गोव्याला जाणारा टिप्पर पलटी झाल्याने त्याखाली सापडून टिप्परचा मालक जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली आहे. गजानन विष्णू चौगुले रा. गणेबैल (वय 24) असे या अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नेहमीप्रमाणे गोव्याला वाळू पुरवठा करणाऱ्या गजानन चौगुले स्वतःचा टिप्पर घेऊन जांबोटी मार्गे गोव्याला जात होता.

बेटणे दरम्यान कासार नाल्यानजीक पडलेला खड्ड्याला चुकवण्याच्या प्रयत्नात चालक गजानन यांचे टिप्पर वरील नियंत्रण सुटले व रस्त्याकडेला असलेल्या एका झाडाला जोराची धडक दिली.

त्यामध्ये गजानन चौगुले यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मृत गजानन यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ , काका असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.