belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगावच्या मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेतर्फे प्रथमच आयोजित गुणांवर आधारित मॅटवरील कुस्ती स्पर्धेतील मानाचा ‘बेळगाव केसरी वन’ हा किताब पुरुष गटात पै. महेश लंगोटी याने तर महिला गटात हल्याळच्या पै. प्रिसिटा सिद्धी हिने पटकाविला. त्याचप्रमाणे ‘बेळगाव तालुका बाल केसरी’ किताब मुलांच्या गटात पै. गगन पुनजगौडा आणि मुलींच्या गटात पै. प्रांजल बिर्जे हिने हस्तगत केला.

सालाबादाप्रमाणे मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना बेळगाव यांच्यावतीने यंदा बेळगावमध्ये प्रथमच आयोजित गुणावर आधारित मॅटवरील भव्य कुस्ती स्पर्धा काल रविवारी यशस्वीरित्या पार पडली.

सलग दोन दिवस आयोजित या स्पर्धेतील पुरुषांच्या खुल्या गटाच्या अंतिम लढतीत पै महेश लंगोटी बेळगाव याने प्रतिस्पर्धी कंग्राळीच्या पै. पार्थ पाटील यावर विजय मिळवत चांदिचा गदा व बेळगाव केसरी वन किताब पटकाविला . महिला गटात हल्याळच्या पै. प्रिसीटा सिध्दी हीने प्रतिस्पर्धी बेळगावच्या पै. स्वाती पाटील हिला हरवून चांदिची गदा व महिला बेळगाव केसरी वन किताब हस्तगत केला.

बेळगाव तालुका मर्यादित मुलांच्यागटात बाल केसरी वन किताब अलारवाडच्या पै. गगन पुनजगौडा याने, तर मुलींच्या गटात बालिका बेळगाव केसरी वन हा किताब अनगोळच्या पै. प्रांजल बिर्जे हीने मिळवला. सदर कुस्ती स्पर्धेत राज्यातील जवळपास 700 हून अधिक कुस्तीपटूनी भाग घेतला होता.Wrestling camp

गेल्या शनिवारी पहिल्या दिवशी प्रमुख पाहुणे डॉ. सोनाली सरनोबत, स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी, गुरूवर्य परशूरामभाऊ नंदिहळ्ळी, अध्यक्ष मारूती, डॉ. गणपत पाटील, हिरालाल चव्हाण, वैभव खाडे, भुषण काकतकर, श्रीमती सुभद्रा मनोहर सांबरेकर, मदनकुमार भैरपन्नावर, सुनिल देशपांडे, मल्लाप्पा सांबरेकर, वाय. पी. नाईक यांच्या उपस्थितीत फित कापुन आखाड्याचे उद्घाटन करण्यात आले. तसेच श्री हनुमान व छ. शिवाजी महाराज फोटो पुजन झाल्यानंतर कुस्ती स्पर्धेला झाली. यावेळी मंडळाच्यावतीने सर्व देणगीदारांचा फेटा बांधुन सत्कार करण्यात आला.

स्पर्धेच्या सांगता समारंभास माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, सामाजिक कार्यकर्त्या भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत, उद्योगपती प्रसन्न घोटगे, मदनकुमार भैरपन्नावर, शंकरगौडा पाटिल, डॉ गणपत पाटील, नगरसेवक रवी साळुंखे, नितीन जाधव, भुषण काकतकर, राजेंद्र कलघटगी, स्वातंत्र्य सैनिक ॲड. नागेश सातेरी, मोनाप्पा मोरे, सतिश पाटील, बाळाराम पाटील, अशोक हलगेकर, वसंत तहशिलदार, परशराम तहशिलदार, प्रफुल्ल सोमणाचे, येळ्ळूर ग्रा. पं. उपाध्यक्ष प्रमोद पाटील, विश्वास पवार, विलास घाडी, जवाहर देसाई आदी उपस्थित होते. सदर मॅटवरील कुस्ती स्पर्धेत वकुंद ह्रिदान काकतकर, हर्ष अंकलीकर, साई गावडे, गगन पुनजगौडा, अनुज कडेमणी, स्वस्तीक मोरे, प्रांजल बिर्जे, प्रार्थना वकुंद, अनुष्का पाटिल, अब्दुल दोडमणी, प्रदीप जे. गोल्याळी, सुनिल हल्याळ, लक्ष्मण सावंत, अभी कुरबर, विलास गोकाक फॉल्स, नित्यानंद सिध्दी, नरेंद्र दावडे मागुर, बजरंग दोडमणी, निंगाप्पा घांडेकर, जिवन पवार, प्रथमेश पावशे, चेतन तुकोजी, ओमकार सौयदनावर, दादापीर सौयदनावर, ओमकार धारवाड, अजित चौगुले, दर्शन तलवार, आदिनाथ कामकर, तिर्थकुंडे सिध्दार्थ, कामकर तिर्थकुंडे, महेश लंगोटी, पार्थ पाटील, मल्लेश मेत्री, सतिश गोकाक, नव्या टी हल्याळ, मनस्वी जायाणाचे, रेणुका सनदी, विद्या कोकितकर, प्रभावती लंगोटी, वाणी हल्याळ, आदिती कोरे, चैत्यन बेळगाव, पुषा नाईक, जानवी किरण, सौंदर्या वातीकर, भक्ती गौडा, भक्ती पाटील, विद्याश्री गंणेण्णावर, सानिका पाटिल, अनुष्का जनगौडा, प्रिसीटा सिध्दी, स्वाती पाटील, शालन सिध्दी, प्रांजल तुळजाई हे सर्व कुस्तीपटू आपापल्या गटात विजेते ठरले.

या स्पर्धेसाठी बेळगाव, हल्याळ, धारवाड डीवायएस संकुलातील एनआयएस कुस्ती प्रशिक्षक तसेच बेळगाव मराठा लाईट इंफंट्री आर्मी कुस्ती प्रशिक्षक पंच म्हणून उपस्थित होते. ही कुस्ती स्पर्धा यशस्वी करण्यसाठी पै अतुल शिरोळे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. आनंदवाडी च्या आखाड्यात पहिल्यांदाच झालेल्या मॅटवरील सदर कुस्ती आखाड्यास कुस्ती प्रेमींनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.