बेळगाव लाईव्ह:सालाबादप्रमाणे ज्योतीनगर, गणेशपूर येथील श्री मसोबा देवस्थानाचा महाप्रसाद सोहळा आज गुरुवारी दुपारी भाविकांच्या उस्फुर्त प्रतिसादात मोठ्या उत्साहात पार पडला.
ज्योतीनगर, गणेशपूर येथील श्री मसोबा देवस्थान नवसाला पावणारे जागृत देवस्थान असल्यामुळे बेळगांवसह कोल्हापूर, गडहिंग्लज, सावंतवाडी, निपाणी, संकेश्वर, खानापूर, आणि गोवा या भागातील भाविकांची महाप्रसाद कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होती.
महाप्रसादानिमित्त निमित्त मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गेल्या 26 वर्षापासून या मंदिरामध्ये दरवर्षी यात्रोत्सव व महाप्रसाद होतो. त्यानुसार यंदाही मंदिराला आकर्षक रंगरंगोटी व विद्युतरोषणाई करण्यात आली होती. महाप्रसाद निमित्त आज सकाळी 7:30 वाजता मसोबाला अभिषेक करण्यात करण्याबरोबरच 9:30 वाजता होमहवन झाले. सर्व धार्मिक कार्यक्रमानंतर सकाळी 11:30 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत भाविकांसाठी महाप्रसाद वाटण्यात आला.
या कार्यक्रमासाठी बऱ्याच देणगीदारांनी देणग्या दिल्या असल्यातरी प्रभाग क्र. 14 शिवाजीनगर बेळगावचे नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनी प्रामुख्याने महाप्रसादाचा खर्च उचलला.
नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्यासह दत्ताजीराव कानुरकर, सोमनाथ खांडोजी, बेनकनहळ्ळी ग्रा. पं. सदस्य मोनेश्वर बाबू गरग, सुभाष लक्ष्मण भोसले, चंदू शंकर दांडेकर, लखन खोरागडे, शंकर झिमा लाखे, आनंद शिंदे, संजय डावाळे, दिपक शंकर लाखे,
परशराम कुरंगी, दत्ताजी कानूरकर व इतर मसोबा भक्तांनी महाप्रसाद यशस्वी होण्यासाठी हातभार लावल्याबद्दल श्री मसोबा सेवा संघाचे चेअरमन सुरेश भोसले, अध्यक्ष बी. डी. भोसले आणि सेक्रेटरी किशोर भोसले यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.