बेळगाव लाईव्ह :भारतीय जीवन विमा निगमने “एलआयसीचा जीवन उत्सव (प्लॅन क्र. 871)” ही आपली नवी योजना काल 29 नोव्हेंबर पासून जारी केली असल्याची माहिती देऊन या योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एलआयसीचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक बी. पी. रवी यांनी दिली.
शहरांमध्ये आज गुरुवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. बी. पी. रवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय आयुर्विमा महामंडळाचे चेअरमन सिद्धार्थ मोहंती यांनी काल 29 नोव्हेंबर 2023 पासून एलआयसीचा जीवन उत्सव ही नवीन योजना सुरू केली आहे.
एलआयसीचा जीवन उत्सव ही वैयक्तिक बचत संपूर्ण जीवन विमा योजना आहे. ही एक मर्यादित प्रीमियम योजना असून जिच्यामध्ये संपूर्ण प्रीमियम भरण्याच्या कालावधीत हमी जोडता येईल.
एलआयसी जीवन उत्सव योजनेसाठीचा अद्वितीय ओळख क्र. (युआयएन) 512एन363व्ही01 हा आहे. ही योजना 90 दिवसांच्या बालकापासून ते 65 वर्षापर्यंतच्या व्यक्तीपर्यंत उपलब्ध आहे. आजीवन उत्पन्नाची हमी आणि लाईफ लॉंग रिस्क कव्हर देणारी ही योजना आहे.
सदर योजनेसाठी किमान प्रीमियम भरण्याची मुदत 5 वर्षे आणि कमाल प्रीमियम भरण्याची मुदत 16 वर्षे इतकी आहे. सदर योजनेअंतर्गत प्रत्येक पॉलिसी वर्षासाठी ज्यासाठी प्रीमियम भरला जातो, हमी जोडणी रुपये 40 प्रति हजार मूळ विमा रक्कम प्रत्येक पॉलिसी वर्षाच्या शेवटी प्रीमियम भरण्याच्या कालावधीत जमा होईल असे सांगून वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक बी. पी.रवी यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे ही योजना परवानाधारक एजंट कार्पोरेट एजंट दलालामार्फत ऑनलाइन खरेदी केली जाऊ शकते. ग्राहक विमा विपणन फॉर्म तसेच आमच्या www.licindia.in वेबसाईटद्वारे देखील थेट ऑनलाईन खरेदी करू शकतात असे रवी यांनी स्पष्ट केले.
त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी इच्छुक आणि कृपया भारताचे कार्यकारी संचालक सीसी एलआयसी मध्यवर्तीय कार्यालय ई-मेल आयडी :ed [email protected] येथे संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेस एलआयसीचे विपणन व्यवस्थापक मनोज मॅथ्यू, विक्री व्यवस्थापक एस. एम. माने, उत्पादन व्यवस्थापक डी. विरुपाक्ष आदी उपस्थित होते.