Tuesday, September 17, 2024

/

4 थ्या आशियाई पॅरा गेम्ससाठी श्रीधर माळगी रवाना

 belgaum

बेळगाव लाईव्ह :बेळगाव, कर्नाटक येथील भारताचा होतकरू दिव्यांग जलतरणपटू श्रीधर नागाप्पा माळगी हा हाॅगझोऊ, चीन येथे होणाऱ्या 4 थ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी आज बुधवारी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चीनकडे रवाना झाला आहे.

चीनमध्ये होणाऱ्या चौथ्या आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताचे 400 हून अधिक दिव्यांग ॲथलेटिक्स सहभागी होणार असून त्यामध्ये 14 जलतरणपटूंचा समावेश आहे. बेळगावच्या श्रीधर माळगी याचा 100 मी. फ्रीस्टाइल, 400 मी. फ्रीस्टाइल आणि 200 मी. वैयक्तिक मिडले या जलतरण स्पर्धांमध्ये सहभाग असणार आहे. त्याला व भारतीय चमूला आशियाई स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

श्रीधर एन. माळगी हा अवघा 24 वर्षाचा जलतरणपटू मजगाव बेळगाव येथे लहानाचा मोठा झाला. तीन मोठ्या बहिणी असलेल्या श्रीधरच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असली तरी त्यांच्या अतूट पाठिंब्याच्या जोरावर श्रीधरची जलतरण कारकीर्द सुरू झाली. वयाच्या अवघ्या 6 व्या वर्षी त्याच्या बाबतीत मोठी शोकांतिका घडली, जेेंव्हा ऑटो रिक्षाच्या गंभीर अपघातात त्याला आपला डावा हात गमवावा लागला. एक हात गमवावा लागल्यामुळे प्रारंभीच्या काळात कोवळ्या वयातील श्रीधरला परिस्थितीवर मात करून रोजच्या जीवनाशी जुळवून घेण्यास बरेच कष्ट घ्यावे. तथापि शाळेला जाणाऱ्या श्रीधरच्या मनातील पोहण्याची आवड त्याला गप्प बसू देत नव्हती. त्याचवेळी गोवावेस अर्थात बसवेश्वर सर्कल येथील रोटरी कॉर्पोरेशन जलतरण तलावाच्या ठिकाणी श्रीधर याच्याकडे एक संधी चालून आली आणि त्या संधीने त्याचे जीवनच बदलून टाकले.Dasra advt

जलतरणातील गुरु उमेश कलघटगी यांनी फक्त एक हात असलेल्या श्रीधर मधील क्षमता ओळखली आणि त्याला पोहण्यासाठी निमंत्रित केले. तेंव्हा श्रीधरने त्यांना हर्षभरीत होकार दिला आणि नव्या पर्वाला सुरुवात झाली. प्रारंभी जलतरण प्रशिक्षणाचा खर्च आपल्याला परवडेल की अशी चिंता वाटत असताना देखील श्रीधरच्या पालकांनीही त्याला पाठिंबा दिला.Malgi

परिणामी 2012 मध्ये उमेश कलघटगी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीधर याचा स्पर्धात्मक जलतरणामधील प्रवास सुरू झाला. तेंव्हापासून जलतरण कौशल्यावर एक हाती प्रभुत्व मिळवलेल्या श्रीधर याने आतापर्यंत 9 आंतरराष्ट्रीय आणि 41 राष्ट्रीय पातळीवरील पदक हस्तगत केली आहेत. त्यामध्ये 36 सुवर्ण, 11 रौप्य आणि 4 कांस्य पदकांचा समावेश आहे. श्रीधर माळगी याचे जलतरणातील बॅकस्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक आणि फ्री स्टाईल या प्रकारांमध्ये विशेष प्रभुत्व आहे. सध्या तो बेंगलोर येथील झी स्विम अकॅडमी आणि बेळगावच्या जेएनएमसी जलतरण तलावात दररोज सकाळी व संध्याकाळी प्रत्येकी 3 तास पोहण्याचा सराव करतो.Dasra advt

त्याला जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी आणि अर्जुन पुरस्कार विजेते माजी ऑलंपियन जलतरणपटू शरथ एम. गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभत आहे. गो स्पोर्ट्स फाऊंडेशन श्रीधर मधील असामान्य प्रतिभा ओळखून त्याला महत्त्वपूर्ण साथ देत आहे.

श्रीधरचे आतापर्यंतचे सर्वात मोठे यश म्हणजे अलीकडेच मेडीरा पोर्तुगाल येथे गेल्या 2022 मध्ये झालेल्या जागतिक पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमधील त्याचा सहभाग हे होय.Dasra advt

आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला, आपल्या गावाचा आणि देशाचा नावलौकिक वाढविण्यासाठी कायम उत्सुक असणाऱ्या श्रीधरने आता आगामी 2024 च्या पॅरा ऑलंपिक आणि आशियाई पॅरा गेम्सवर आपले लक्ष केंद्रित केले असून त्यासाठी तो प्रचंड मेहनत घेत जोरदार तयारी करत आहे.

प्रतिभावंत श्रीधर नागाप्पा माळगी याला त्याच्या कुटुंबीयांसह केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ प्रभाकर कोरे, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत कुंभारवाडी एस एल के ग्रुप बेंगलोर अलाईड फाउंड्रीज बेळगाव अविनाश पोतदार लता कित्तूर माणिक कापाडिया सुधीर कुसाने प्रसाद तेंडुलकर आदींचे प्रोत्साहन लाभत आहे.Dasra advt 1

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.