बेळगाव लाईव्ह: बेळगाव-गोवा महामार्गासाठी संपादित करण्यात केलेल्या जमिनीच्या भरपाई वितरणातील सावळा गोंधळ दूर करून शेतकऱ्यांच्या उस्थितीत संयुक्त सर्व्हे करा अशी मागणी करत शेतकऱ्यांनी बेळगाव खानापूर रोड वर गणेबैल टोल नाक्याजवळ आंदोलन करत रस्ता रोको केला होता
या आंदोलनामुळे बेळगाव- खानापूर मार्गावरील रहदारी काही खोळंबली होती. शेतकऱ्यांच्या जमिनीची योग्य रपाई न मिळाल्यास २५ ऑक्टोबरपासून टोल सुली कायमची बंद करण्यात येईल, असा शाराही शेतकऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.
रयत संघटना आणि महामार्गात जमीन मावलेल्या शेतकन्यांच्या वतीने गुरुवारी गणेबल ल नाक्यावर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात ले. शेतकऱ्यांनी काही काळ टोल वसुली बंद बडली. त्यानंतर भूसंपादन अधिकारी बलराम व्हाण, तहसीलदार प्रकाश गायकवाड, डीएसपी नाईक यांनी शेतकन्यांशी चर्चा केली.
भूमापन विभाग, भूसंपादन अधिकारी आणि शेतमालक यांच्या उपस्थितीत संपादित व शिल्लक जमिनीचा सर्व्हे करण्यात यावा. त्याशिवाय शेतकन्यांना त्यांच्या नुकसानीची निश्चित माहिती कळणार नाही, असे एम. आर. पाटील यांनी सांगितले.
शेतकरी नेते प्रकाश नाईक म्हणाले, भरपाई आणि सर्वेक्षणासंबंधी तक्रारी दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनीच शेतकन्यांशी नियमित संवाद व संपर्क ठेवावा.त्यानंतर सोमवारी (दि.९) सकाळी १० वाजता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात भूसंपादन अधिकारी बलराम चव्हाण स्वतः शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निरसन करतील,
अँड. सोनाप्या नंद्रणकर शेतकऱ्यांची बाजू मांडताना म्हणाले, अनेक शेतकऱ्यांना भरपाईचा दर निर्धारित केलेल्या आदेशाच्या प्रती (अवार्ड कॉपी) देण्यात आलेल्या नाहीत. त्या मिळाल्याशिवाय असे सांगण्यात आले. शेतकऱ्यांना आपल्या जमिनीला किती दर निश्चित करण्यात आला आहे हे कळणार नाही.
तसेच वाढीव भरपाईसाठी न्यायालयाकडे दादही मागता येणार नाही. त्यामुळे ते आदेश मिळावेत, शेतकऱ्यांना तलाठ्यामार्फत नोटीस पाठवण्यात आल्या आहेत
निकाल लागलेल्या शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या!
जिल्हाधिकाऱ्यांच्या लवादाने ज्या भरपाई प्रकरणांचा निकाल दिला आहे. त्या शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाईची रक्कम त्वरित अदा करण्यात यावी. कागदपत्रांचे निमित्त करून दिरंगाई करू नये, अशी मागणी भूसंपादन अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.