Sunday, July 21, 2024

/

दोन दिवस शहरातील बत्ती असणार गुल

 belgaum

बेळगाव लाईव्ह: बेळगाव शहरातील 33 केव्ही वीजकेंद्राच्यावतीने दुरुस्तीकाम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवार दि. 15 व शनिवार 16 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत विविध भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

शुक्रवार दि. 15 रोजी टिळकवाडी नेहरु रोड, पहिले रेल्वे गेट, आगरकर रोड, दुसरे रेल्वे गेट, पावर हाऊस, राणा प्रताप रोड, हिंदवाडी रेल्वे गेट, खानापूर रोड, सराफ गल्ली, आर. पी. डी. चौक, सोमवार पेठ, मंगळवार पेठ, बुधवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, महावीर भवन, वड्डर गल्ली.

जक्कीन होंडा परिसरातील सर्वोदय हॉस्टेल, गुडशेड रोड, खानापूर रोड, स्वामी विवेकानंद परिसरातील मराठा कॉलनी, काँग्रेस रोड, एस. व्ही. कॉलनी, एम. जी. कॉलनी, टिळक चौक, शिवभवन, स्टेशन रोड, कोनवाळ गल्ली, शिवाजी रोड, बसवण गल्ली, देशपांडे गल्ली, त्याचबरोबर धर्मवीर संभाजी चौक, खानापूर रोड, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकर बाग, कडोलकर गल्ली,

हंस टॉकीज रोड, संपूर्ण मिलिटरी महादेव परिसर, जेल विंग एक्सप्रेस फिडर, कॅण्टोन्मेट परिसरातील विजयनगर, ओंकारनगर, विनायकनगर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंगखिंड गल्ली, नानावाडी परिसरातील करियप्पा कॉलनी, आश्रयवाडी शांती कॉलनी, चौगलेवाडी, शिवाजी कॉलनी, मनियर लेआउट, व्दारकानगर, अयोध्यानगर, शहापूर परिसरातील गुडशेड रोड, गोडसे कॉलनी, सागर ट्रान्सपोर्ट, कोरे गल्ली, मिरापूर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळी गल्ली, रामलिंगवाडी, शास्त्रीनगर, कपिलेश्वर परिसरातील गांधी उद्यान, शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, कचेरी गल्ली, दाने गल्ली, एस. पी. एम. रोड, तांगडी गल्ली, रामा मेस्त्री अड्डा, भोज गल्ली परिसरातील वीजपुरवठा खंडित होणार आहे.

शनिवार दि. 16 रोजी आझाद नगर, जुने गांधी नगर, दीपक गल्ली, संकम हॉटेल, बागलकोट रोड, फोर्ट रोड परिसरातील कलमठ रोड, जुना पी. बी. रोड, फुलबाग गल्ली, ताशिलदार गल्ली, भांदूर गल्ली, पाटील गल्ली, बसवण कुडची आणि देवराज अर्स कॉलनी, आय. बी. सेेंटर, बस स्टँड, शेट्टी गल्ली, चव्हाट गल्ली, नाना पाटील चौक, दरबार गल्ली, जालगार गल्ली, कसाई गल्ली, कीर्ती हॉटेल, वन कार्यालय, आर. टी. ओ. कार्यालय, कोतवाल गल्ली, डी. सी. सी. बँक, खडेबाजार परिसर, शीतल हॉटेल, खडेबाजार परिसरातील काकतीवेस,

शनिवार खुट, समादेवी गल्ली, गोंधळी गल्ली, नार्वेकर गल्ली, कचेरी गल्ली. धारवाड रोड परिसरातील उज्ज्वल नगर, गांधी नगर, अमननगर, एस. सी. मोटर परिसर, मारुती नगर, माळी गल्ली परिसरातील दरबरा गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, आझाद गल्ली, पांगुळ गल्ली आणि भोई गल्ली येथील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.