belgaum

24 तासांत दोन चोरीच्या कार जप्त; एपीएमसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई

0
390
Apmc police station
Apmc police station
 belgaum

 belgaum

बेळगाव लाईव्ह : एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अवघ्या 24 तासांत दोन चोरीच्या कार जप्त करत तब्बल 29 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईमुळे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे कौतुक होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर हनुमान नगर येथील प्रियांका चेतन अजरेंकर (वय 39) यांनी आपल्या घरासमोर उभी केलेली किआ सेल्टॉस कार (KA-22 MC-8122) चोरीला गेल्याची तक्रार 10 मे रोजी एपीएमसी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2) अंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलीस उपायुक्त (गुन्हे व वाहतूक) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच खडेबाजार उपविभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक यू. एस. अवटी यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक स्थापन करण्यात आले होते.

 belgaum

या पथकाने तपासाची सूत्रे वेगाने हलवत मुंबई येथे जाऊन चोरीला गेलेली किआ सेल्टॉस कार अवघ्या 24 तासांत शोधून काढली. तपासादरम्यान धारवाड सब-अर्बन पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेली हुंडाई क्रेटा कारही पोलिसांनी हस्तगत केली.

जप्त करण्यात आलेल्या वाहनांची एकूण किंमत सुमारे 29 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी दोन्ही वाहने टाकून पळ काढला असून त्यांचा शोध सुरू आहे.

या कारवाईत पीएसआय एस. के. होळेन्नवर, एएसआय एम. ए. पाटील तसेच कर्मचारी डी. सी. सागर, बसवराज नरगुंद, गोविंदप्पा पुजार, रफीक मुजावर, शिवाजी चव्हाण आणि रमेश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.