बेळगाव लाईव्ह शिक्षण खात्याने सहावी ते दहावी पर्यंतच्या इयत्तांच्या सहामाही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून येत्या शुक्रवार दि. 29 सप्टेंबरपासून ही परीक्षा प्रारंभ होणार आहे.
त्याचप्रमाणे पहिली ते पाचवीची सहामाही परीक्षा दि. 3 ते 7 ऑक्टोबर 2023 दरम्यान पार पडणार आहे.
दरवर्षी दसरा सणाच्या सुट्टीला सुरुवात होण्यापूर्वी सहामाही परीक्षांचे आयोजन केले जाते. मात्र आता शिक्षण खात्याने वेळापत्रक जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना जोमाने परीक्षेची तयारी करावी लागत असून परीक्षा चांगल्या प्रकारे घेण्याची सूचना शाळांना करण्यात आली आहे.
सहावी ते दहावीच्या सहामाही परीक्षेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 19 सप्टेंबर -मराठी (प्रथम भाषा), 30 सप्टेंबर -गणित, 3 ऑक्टोबर -द्वितीय भाषा, 4 ऑक्टोबर -विज्ञान, 5 ऑक्टोबर -तृतीय भाषा, 6 ऑक्टोबर -समाज विज्ञान, 7 ऑक्टोबर -चित्रकला, क्रीडा शिक्षण.
तसेच पहिली ते पाचवीचे वेळापत्रक : 3 ऑक्टोबर -प्रथम भाषा, 4 ऑक्टोबर -गणित, 5 ऑक्टोबर -द्वितीय भाषा, 6 ऑक्टोबर -परिसर अध्ययन आणि 7 ऑक्टोबर -चित्रकला क्रीडा शिक्षण.