Saturday, July 27, 2024

/

या भागात होणार वीज पुरवठा खंडित

 belgaum

हेस्कॉमने गुरुवार दिनांक 10 रोजी विविध भागात वीज पुरवठा खंडित करण्याचे घोषित केले आहे. दुरुस्तीच्या कारणास्तव बेळगाव दक्षिण भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन हेस्कॉमतर्फे करण्यात आले आहे.

सकाळी सहा ते दुपारी एक वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद करण्यात येणार आहे. दरम्यान औद्योगिक वसाहतीमध्ये ही हा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

खानापूर रोड, उद्यमबाग, राणी चन्नम्मा नगर, तिसरे रेल्वे गेट, सुभाषचंद्र कॉलनी, औद्योगिक परिसर, जीआयटी कॉलनी परिसर, विश्वकर्मा कॉलनी, स्वामीनाथ कॉलनी, नित्यानंद कॉलनी, डिफेन्स कॉलनी, वाटवे कॉलनी, जैतन माळ, महावीर नगर, खानापूर रोड ज्ञान प्रबोधन शाळा परिसर, गुरूप्रसाद कॉलनी,

मंडोळी रोड, कावेरी कॉलनी, पार्वती नगर आदी भागात हा वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी व उद्योजकांनी याची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉम तर्फे करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.