Saturday, July 13, 2024

/

महामेळावा प्रकरणी सुनावणी पुढे ढकलली

 belgaum

बेळगाव लाईव्ह :कर्नाटकी विधीमंडळ अधिवेशनाविरोधात 2021 साली महामेळावा आयोजित केल्याप्रकरणी म. ए. समितीच्या 30 जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणाची सुनावणी लांबणीवर पडली आहे आता या प्रकरणी पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.

चौथे जेएमएफसी न्यायालयात बुधवारी सुनावणी होणार होती. पण, संशयित 30 पैकी दहा जण अनुपस्थित राहिले त्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली.

2021 साली कर्नाटक सरकारने बेळगाव जवळील हलगा येथील सुवर्णसौध येथे विधीमंडळ अधिवेशनाचे आयोजन केले होते. त्याविरोधात नेहमी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण समिती नेत्यांनी व्हॅक्सीन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पण, या महामेळाव्याला महापालिकेने परवानगी दिली नाही. त्यामुळे महापालिकेने टिळकवाडी पोलिसांत अध्यक्ष दीपक दळवी यांच्यासह 30 जणांवर गुन्हा नोंदवला होता. त्याची सुनावणी आज होती.

पण, अनेक संशयित गैरहजर राहिल्याने सुनावणी लांबणीवर पडली. पुढील सुनावणी 21 ऑगस्ट रोजी होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.