Friday, May 17, 2024

/

मनपा स्थायी समिती झाली बिन विरोध!

 belgaum

बेळगाव मनपात स्थायी समिती निवडणुकीत चारी स्थायी समिती भाजपकडे राहिल्या आहेत.आता पर्यंतच्या इतिहासात महाराष्ट्र एकीकरण समितीचे बहुमत होते सत्ताधारी म ए समितीला चार आणि विरोधी गटाला तीन सदस्य असे समीकरण होते पण या वेळेला भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले असल्याने एकूण सदस्य संख्ये सात पैकी पाच दोन असे समीकरण झाले आहे.

बेळगाव मनपात अर्थ आणि कर, आरोग्य सामाजिक न्याय आणि नगर नियोजन आणि बांधकाम यासह लेखा अश्या चार स्थायी समित्या आहेत.

बेळगाव मनपात विरोधी गटाने भाजपकडे चार तीन अशी मागणी केली मात्र भाजपने नेत्यांनी सदर मागणी धुडकावून पाच दोन किंवा निवडणूक झाल्यास सात झिरो असा प्रस्ताव दिला अखेर विरोधी गटाने नमते घेतले  त्यामुळे अखेर पाच दोन अश्या समिकरणवर संगनमत झाले.

 belgaum

बेळगाव महानगरपालिकेच्या विविध स्थायी समित्यांच्या निवडणुकीसाठी नामांकन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया आज शनिवारी सकाळी सुरू झाली होती चार स्थायी समितीच्या या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसच्या सदस्यांनी अर्थात नगरसेवकांनी नामांकन पत्रे दाखल केली आहेत.Standing committee bgm

बेळगाव महापालिकेच्या अर्थ स्थायी समिती, सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती, महसूल स्थायी समिती आणि आरोग्य स्थायी समिती या समित्यांच्या अध्यक्षपदासाठी सदर नामांकन पत्रे दाखल करण्यात आली आहेत. आतापर्यंत या चार समित्यांच्या अध्यक्षपदासाठी आज सकाळी प्रारंभीच्या सत्रात नामपत्र भरण्याची मुदत संपण्यास एक तास असताना भाजप आणि काँग्रेसच्या एकूण 28 नगरसेवकांनी नामांकनपत्रे दाखल केली होती.

शनिवारी बेळगाव महापालिकेच्या स्थायी समितीची निवडणूक होणार होती मात्र मनपातील सत्तारूढ पक्षाने विरोधी पक्षाला दोन सदस्य दिल्याने सदर निवडणूक बिन विरोध पार पडली. चार स्थायी समित्यात प्रत्येकी सात असे एकूण 28सदस्यांची नियुक्ती स्थायी समितीवर करण्यात आली आहे.
नियुक्त करण्यात आलेले सदस्य आणि स्थायी समित्या

अर्थ कर आणि दाद स्थायी समिती
वीणा विजापूरे
रेखा हुगार
उदय उपरी
संदीप जिर्ग्याळ
प्रीती कामकर
रेश्मा भैरकदार
शामोबिन पठाण

आरोग्य शिक्षण आणि सामाजिक न्याय समिती

रवी धोत्रे
रमेश मैलागोळ
रेश्मा कामकर
श्रेयस नाकाडी
जयंत जाधव
खुर्शीद मुल्ला
इकरा मुल्ला

नगर नियोजन आणि विकास स्थायी समिती

वाणी जोशी
आनंद चव्हाण
मंगेश पवार
संतोष पेडणेकर
रुपा चिखलदिनी
जरीना फतेहखान
शकीला मुल्ला

लेखा स्थायी समिती
सविता पाटील
गिरीश धोंगडी
अभिजित जवळकर
जयतिर्थ सौंदत्ती
पूजा पाटील
ज्योती कडोलकर
अफरोज मुल्ला

 

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.