बेळगाव लाईव्ह : कर्नाटक सरकारने जारी केलेल्या शक्ती योजनेला एक महिन्याचा कालावधी उलटला असून या एक महिन्याच्या कालावधीत परिवहन महामंडळाच्या बसमधून तब्बल 4.02 कोटी महिलांनी प्रवास केला असून यादरम्यान महिला प्रवाशांनी केलेल्या तिकिटाचे एकूण मूल्य 103.51 कोटी रुपयांच्या घरात पोहोचले असल्याची माहिती वायव्य कर्नाटक परिवहन मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक भरत एस. यांनी दिली.
कर्नाटक सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या ‘शक्ती’ योजनेला कर्नाटकातील महिलांसाठी सरकारी बसमधून मोफत प्रवास करण्याच्या योजनेला अपेक्षेपेक्षा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. हा प्रकल्प 10 जुलै रोजी सुरु करण्यात आला होता. हि योजना लोकसहभाग आणि सहकार्याने यशस्वीरित्या प्रगतीपथावर असून 11 जून ते 10 जुलै या कालावधीत वायव्य कर्नाटक परिवहन च्या अखत्यारीतील धारवाड, बेळगाव, बागलकोट, गदग, हावेरी आणि उत्तर कन्नड या सहा जिल्ह्यांतील 9 परिवहन विभागातील बसमधून एकूण 40252638 महिलांनी मोफत प्रवास केला आहे तर यादरम्यान महिला प्रवाशांच्या तिकीटाची किंमत रु. 1035165967 इतकी झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
शक्ती योजने अंतर्गत हुबळी धारवाड शहर विभागातून 54,23,700 महिलांनी प्रवास केला असून त्यांचे तिकीट मूल्य 6,64,83,273 इतके आहे. हुबळी ग्रामीण विभागातून 27,70,090 महिलांनी प्रवास केला असून त्यांचे तिकीट मूल्य 10,01,89,702 इतके आहे.
धारवाड विभागातून 3,26,298 महिलांनी प्रवास केला असून त्यांचे तिकीट मूल्य 8,93,61,503 इतके आहे. बेळगाव विभागातून 61,15,163 महिलांनी प्रवास केला असून त्यांचे तिकीट मूल्य 12,70,99,283 इतके आहे. चिक्कोडी विभागातून 52,83,421 महिलांनी प्रवास केला असून त्यांचे तिकीट मूल्य 13,52,65,560 इतके आहे. बागलकोट विभागातून 49,70,498 महिलांनी प्रवास केला असून त्यांचे तिकीट मूल्य 16,07,82,999 इतके आहे.
गदग विभागातून 42,45,811 महिलांनी प्रवास केला असून त्यांचे तिकीट मूल्य 13,02,22,151 इतके आहे. हावेरी विभागातून 44,97,458 महिलांनी प्रवास केला असून त्यांचे तिकीट मूल्य 12,40,80,658 इतके आहे. उत्तरा कन्नड विभागातून 36,77,199 महिलांनी प्रवास केला असून त्यांचे तिकीट मूल्य 10,16,80,838 इतके आहे.
काही किरकोळ अनुचित घटनांशिवाय हा प्रकल्प कोणतीही अडचण न येता यशस्वीपणे पार पडत असून परिवहन महामंडळात नवीन बसेसची भर पडली नाही शिवाय ड्रायव्हिंग आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची भरतीहि झालेली नाही. तथापि, सर्व कर्मचारी आणि अधिकारी यांच्या टीमने उपलब्ध बसेस आणि मनुष्यबळाचा कार्यक्षम वापर करत हा प्रकल्प यशस्वी ठरवला असल्याचे भरत एस. म्हणाले.
शिवाय शनिवार व रविवार, सण आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी देखील या योजनेसाठी अधिकारी व कर्मचारी बसस्थानकांवर उपस्थित राहून गर्दीला सामोरे जातात आणि अधिकाधिक सेवा पुरवितात, हि बाब कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.