Friday, September 20, 2024

/

‘खाकी’तील प्राणिदया!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : हिरेकुडी नंदीपर्वत येथील कामकुमार नंदी महाराजांच्या हत्येनंतर या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपीपैकी एक असलेल्या नारायण माळी याच्या घराला सुरक्षेच्या कारणास्तव पोलीस सुरक्षा पुरविण्यात आली असून नारायण माळी याच्या घरात खाकी वर्दीतील पोलिसांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.

जैन मुनी हत्येप्रकरणी पोलिसांनी नारायण माळी अटक केली होती. त्याच्या अटकेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारीच्या कारणास्तव केएसआरपी आणि सिव्हिल पोलिसांनी ७ जून रोजी घराला सुरक्षा पुरवली होती. ही बातमी कळताच माळी कुटुंबीय गुरे टाकून पळून गेले.

घराशेजारील शेडमध्ये दोन गायी, दोन म्हशी आणि ४० हून अधिक शेळ्या आहेत. त्यांचे पालनपोषण करणारे कोणी नाही. अशातच ओढवलेल्या पाणीटंचाईमुळे आणि उपासमारीने झुंजत असलेली गुरे पाहून पोलीस स्वतः त्यांच्यासाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था करत आहेत. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून त्यांची काळजी घेणाऱ्या पोलिसांच्या मानवतावादी कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.Animal love khakhi

खुनाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या नारायण माळी याच्या कुटुंबीयांनी घरातून पळ काढल्यानंतर माघारी असलेल्या दोन गायी, दोन म्हशी आणि ४० हून अधिक शेळ्या यांची व्यवस्था करण्यासाठी कुणीच उपलब्ध नाही.

यामुळे घराच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेले केएसआरपी पोलीस आणि चिक्कोडी पोलीस गेल्या चार दिवसांपासून नारायण माळी याने पाळलेल्या शेळ्या आणि गायींची काळजी घेत आहेत.

निर्घृण हत्येच्या आरोपाखाली ज्याला अटक केली त्याच्याच घरी अशा पद्धतीने प्राणिदया दाखविणारे खाकी वर्दीतील पोलीस कौतुकाचे मानकरी ठरले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.