Saturday, July 13, 2024

/

तांदळा ऐवजी मिळणार रोख रक्कम…

 belgaum

बेळगाव लाईव्ह :अन्नभाग्य योजनेंतर्गत राज्य शासनाकडून अंत्योदय आणि बीपीएल रेशनकार्डधारकांना अतिरिक्त तांदळाऐवजी रक्कम हस्तांतरण करण्यात येत आहे. यासाठी दरमहा बेळगाव जिल्ह्याला ५८ कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

पहिल्याच महिन्यात जिल्ह्यातील ८.२९ लाख शिधापत्रिकाधारकांसाठी ४६.५४ कोटी रुपये रक्कम मंजूर झाली असून ती लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येत आहे. जिल्ह्यात ६६,६३६ अंत्योदय आणि १०,८०,८८० बीपीएल अशी एकुण ११,४९,५१६ कार्डधारक कुटुंब आहेत. या एकूण कुटुंबात ३७,७२,३१५ लाभार्थी असून या सर्वांना अन्नभाग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.

काँग्रेसने निवडणुकीच्या काळात सत्तेवर आल्यास प्रत्येक सदस्याला पाच किलो ऐवजी दहा किलो तांदूळ देण्याची घोषणा केली होती. मात्र सध्या इतक्या मोठ्या प्रमाणात तांदळाचा पुरवठा होणे शक्य नसल्याने पाच किलो तांदूळ पुरवठा केले जाणार असून उर्वरित पाच किलो तांदळाच्या बदल्यात लाभार्थी सदस्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा केली जाणार आहे.

दर महिन्याला ५८.४९ कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्याला येणार असून, ३७ लाखांहून अधिक लोकांना अन्नभाग्य योजनेच्या लाभासह धान्य देखील मिळणार आहे.

D c office
Dc office file

पहिल्या महिन्यात योजनेसाठी नोंदणी केलेल्या ८,२९,२०८ अंत्योदय आणि बीपीएल कुटुंबांच्या बँक खात्यात येत्या दोन दिवसात पैसे जमा केले जाणार आहेत. जिल्ह्यात ६८,२३० अंत्योदय कार्डधारक असून पैकी तीन सदस्याहून कमी असलेल्या २४ हजार कुटुंबांना अन्नभाग्य योजना अंतर्गत पैसे मिळणार नाहीत.

यासह २४ बीपीएल कार्ड धारकांचे बँक खाते बंद पडले आहेत. तर १.२४ लाख कुटुंबांकडे बँक खातेच नाही. अशा सर्वांची यादी स्वस्त धान्य दुकानात देण्यात आली असेल या लोकांशी संपर्क साधून बँक किंवा पोस्ट खात्यामध्ये त्यांच्या खाते उघडण्यासाठी प्रयत्न केले जात आहे.

आधार लिंक असलेल्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या माहितीनुसार कुटुंबातील सदस्यांच्या संख्येप्रमाणे प्रत्येक कुटुंबांच्या खात्यावर योजनेची थेट रक्कम जमा करण्यासाठी म्हणून ४६,५४,१८,५२० रुपये अनुदान उपलब्ध झाले आहे, असे अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे उपसंचालक श्रीशैल कंकणवाडी यांनी कळवले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.