belgaum

पत्रकारांच्या नावाने खंडणी उकळणारे चौघे जेरबंद

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : पत्रकार असल्याचे भासवून कारवाईची भीती दाखवत एका नागरिकाकडून खंडणी उकळणाऱ्या चार संशयितांना हुक्केरी पोलिसांनी अटक केली आहे.

संशयितांकडून गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. कोटाबागी येथील रहिवासी महेबूब बाबूसाब जमादार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका व्यक्तीने त्यांना गांजाच्या पुड्या देऊन पैसे घेतले. त्यानंतर आलेल्या चार जणांनी स्वतःला पोलीस असल्याचे सांगून कारवाईची भीती दाखवली आणि त्यांना गाडीत घालून हुक्केरी पोलीस ठाण्याजवळ आणले. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्यांनी दोन ते तीन लाख रुपयांची मागणी केली आणि ६० हजार रुपये उकळले.

या प्रकारानंतर संशयितांनी तक्रारदाराचा व्हिडिओ ‘जी. डी. टीव्ही’ नावाच्या सोशल मीडियावर प्रसारित केला होता. याप्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 belgaum

जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हुक्केरी पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवून कल्लप्पा माळाज (संपूर्ण युट्युबर, रा. हुक्केरी), मल्लिकार्जुन जुलफी (एम२ युट्युबर, रा. नागरमुन्नोळी, ता. चिकोडी), पृथ्वीराज चौहान (जी. डी. युट्युबर, रा. मानागाव, ता. चंदगड) आणि डेव्हिड तंगेराळ (जी. डी. युट्युबर, रा. बेळगाव) या चौघांना बेळगाव येथे ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयितांकडून एक चारचाकी, एक दुचाकी, दोन मोबाईल आणि ३४ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे. सर्व संशयितांना हुक्केरी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.