Saturday, July 27, 2024

/

विकास कुमार बेळगाव उत्तर विभागाचे नवे पोलीस महासंचालक

 belgaum

बेळगाव उत्तर विभाग पोलीस महासंचालक पदी विकास कुमार यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा आदेश राज्य शासनाने बजावला आहे.

बेळगाव उत्तर विभागामध्ये बेळगावसह विजयपुर, धारवाड, बागलकोट आणि गदग या जिल्ह्यांचा समावेश आहे.

या अगोदर रमण गुप्ता यांची बेळगाव रेंज आय जी पी पदी नियुक्ती झाली होती त्यानंतर लागलीच गुप्ता यांच्या ठिकाणी लोकेश कुमार यांच्या नावाचा देखील आदेश झाला होता आता विकास कुमार यांच्या नावाचा नवीन आदेश जारी करण्यात आला आहे.

बेळगाव पोलीस आयुक्त डॉ एम बी बोरलिंगय्या यांच्या ठिकाणी कोणत्या अधिकाऱ्याची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागले आहे. बेळगाव पोलीस आयुक्त हे पद डी आय जी श्रेणीचे असते.

बी. एस. लोकेश कुमार बेळगाव उत्तरचे नवे आयजीपी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.