29 C
Belgaum
Sunday, December 3, 2023
 belgaum

Daily Archives: Jun 28, 2023

ॲपल मोबाईलचे सुटे तयार करणारे युनिट बेळगावात

ॲपल फोन बनवणाऱ्या फॉक्सकॉनला या स्पेअर पार्ट्स बनवणारी आणि पुरवठा करणारी SFS कंपनीने बेळगावात 250 कोटी रु. गुंतवणुकीसाठी पुढे येत असून त्यांनी युनिट स्थापित करण्यासाठी 30 एकर जमीन मागितली आहे. हा स्वागतार्ह प्रस्ताव असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून...

एकादशीच्या साहित्य खरेदीसाठी बाजारात गर्दी

बेळगाव लाईव्ह : हिंदू पंचांगानुसार गुरुवार दि. २९ जून रोजी साजऱ्या केल्या जाणाऱ्या देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त बेळगावमधील बाजारपेठेत उपवासासाठी लागणारे साहित्य दाखल झाले आहे. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष असे महत्व असून वारकरी संप्रदायासाठी मोठा उत्सव असणाऱ्या देवशयनी एकादशीनिमित्त उपवास...

आयजीपी विकाशकुमार विकास यांनी स्वीकारला पदभार

बेळगाव उत्तर विभागाचे नूतन पोलीस महानिरीक्षक (आयजीपी) म्हणून विकाशकुमार विकास यांनी आज बुधवारी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली. यावेळी बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील यांनी नव्या पोलीस महानिरीक्षकांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. पदभार स्वीकारण्यासाठी कार्यालयाच्या ठिकाणी आलेल्या...

महापालिकेकडून मोकाट जनावरे पकडण्याची मोहीम

शहरात रहदारीला अडथळा ठरणार्‍या मोकाट जनावरांना पकडून त्यांची श्रीनगर येथील गोशाळेत रवानगी करण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली असून नरगुंदकर भावे चौक येथे आज बुधवारी सकाळी महापालिकेच्या पथकाने 8 मोकाट जनावरे पकडली. शहरात वाहतुकीला अडथळा ठरणार्‍या मोकाट जनावरांना पकडण्याच्या आदेशानुसार महापालिकेच्या...

मोफत बस प्रवासामुळे धार्मिक स्थळांवर वाढती गर्दी

काँग्रेस सरकारच्या पाच महत्त्वाकांक्षी गॅरंटी योजनांपैकी महिलांसाठीच्या मोफत बस प्रवास योजनेला व्यापक प्रतिसाद मिळत असून विशेष करून बेळगावसह राज्यातील विविध धार्मिक स्थळांच्या ठिकाणी महिलांच्या गर्दीत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यातील काँग्रेस सरकारने महिलांसाठीची मोफत बस प्रवासी योजना अमलात आणल्यानंतर बेळगाव...

मोफत बस प्रवास : वायव्य परिवहन तिसऱ्या क्रमांकावर

महिलांना राज्य शासनाच्या मोफत बस प्रवासाचा लाभ मिळवून देण्यात बेंगलोरचे बीएमटीसी आणि केकेआरटीसी यांच्या मागोमाग कर्नाटक वायव्य रस्ते परिवहन महामंडळ(एनडब्ल्यूकेएसआरटीसी) राज्यामध्ये तिसरा क्रमांकावर आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या पाच गॅरंटी योजनांपैकी एक असलेल्या महिलांच्या मोफत बस प्रवास योजनेला गेल्या तीन आठवड्यात...

कॅन्सरग्रस्त ज्येष्ठ समाजसेवकासाठी मदतीचे आवाहन

येरमाळ रोड, पाटील गल्ली वडगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक मनोहर गुरुनाथ शिरोडकर यांना कॅन्सर अर्थात कर्करोगाचे निदान झाले असून त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करणाऱ्या 72 वर्षीय मनोहर शिरोडकर यांच्याबाबतीत अलीकडे...

हेस्कॉम अभियंत्यांच्या घरावर धाड

बेळगावातील अभियंत्याच्या घरावर लोकायुक्तांची धाड पडली आहे. रामतीर्थ नगर बेळगाव येथे हेस्कॉम कार्यकारी अभियंते शेखर बहुरूपी यांच्या घरावर धाड टाकण्यात आली आहे. शेखर बहुरूपी हे विजापूर जिल्ह्याच्या हरपनहळळी येथे अभियंता म्हणून कार्यरत होते. बहुरूपी हे 2019 साली अथनी येथे सेवा बजावत...

वंदे भारत सह विमानसेवेसाठीही केंद्रीय मंत्र्यांना नागरिकांचे साकडे

बेळगाव लाईव्ह : बहुचर्चित 'वंदे भारत' या सुपरफास्ट रेल्वेसेवेचा आज विविध पाच ठिकाणाहून लोकार्पण सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून वंदे भारत रेल्वे सेवेचा शुभारंभ केला. यादरम्यान कर्नाटकातील धारवाडमधून हुबळीसाठी वंदे भारत रेल्वे धावली. यावेळी...
- Advertisement -

Latest News

इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट

*बेळगाव LIVE व ऐम कोचिंग तर्फे आयोजित स्पर्धा परीक्षा - इंग्रजी भाषा साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट* SSC, बँकिंग, रेल्वे, आर्मी, नेव्ही...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !