Sunday, September 1, 2024

/

कॅन्सरग्रस्त ज्येष्ठ समाजसेवकासाठी मदतीचे आवाहन

 belgaum

येरमाळ रोड, पाटील गल्ली वडगाव येथील ज्येष्ठ समाजसेवक मनोहर गुरुनाथ शिरोडकर यांना कॅन्सर अर्थात कर्करोगाचे निदान झाले असून त्यांची घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

गेली अनेक वर्ष सामाजिक कार्य करणाऱ्या 72 वर्षीय मनोहर शिरोडकर यांच्याबाबतीत अलीकडे घशाच्या कॅन्सरचे निदान झाले आहे. येरमाळ रोड, पाटील गल्ली वडगाव येथील दोन खोल्यांच्या स्वतःच्या मालकीच्या घरात पत्नी समवेत राहणाऱ्या वयस्क शिरोडकर यांना मूलबाळ नाही.

तसेच त्यांच्या आप्तस्वकीयांनीही त्यांना वाळीत टाकले आहे. घशाला कॅन्सर झाला असल्यामुळे मनोहर यांची अन्ननलिका बंद होऊन त्यांना कांही खाता येत नाही. ग्लुकोज, पाणी, शहाळी यासारख्या द्रवपदार्थावरच ते जगत आहेत. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत चालली असून घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे ते असहाय्य बनले आहेत.

त्यांना सध्या मदतीची अत्यंत गरज आहे. आपल्याला झालेल्या कॅन्सरवर मात करून पुन्हा जनसेवेला वाहून घेण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे. तरी सेवाभावी संघ संस्था आणि दानशूर व्यक्तींनी आपल्या परीने सढळ हस्ते मनोहर गुरुनाथ शिरोडकर यांना सहाय्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इच्छुकांनी आर्थिक सहाय्य ठिकाणी करावे -खाते क्र. 17007524003, आयएफएससी कोड : केव्हीजीबी 0002211, नांव : मनोहर गुरुनाथ शिरोडकर, बँक : कर्नाटक विकास ग्रामीण बँक, शाखा : शहापूर.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.