Thursday, April 25, 2024

/

महाराष्ट्राचे दिल्लीत अनुबंध साधणार बेळगावचा युवक

 belgaum

बेळगावचा युवक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचे दिल्ली आणि राज्य सरकारचे समन्वय साधण्याचे काम पहाणार आहे.बेळगाव केळकर बाग येथील रहिवासी अभिषेक जाधव असे या युवकाचे नाव असून त्यांची नियुक्ती झाली आहे.

नुकताच त्यांची महाराष्ट्र शासनाने नियुक्ती केली असून त्यांनी कार्य सुरू केले आहे.महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे दिल्लीतील प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अभिषेक हे केंद्र आणि महाराष्ट्र शासनात यांच्यात समन्वय साधणार आहेत. नवी दिल्ली येथील नवीन महाराष्ट्र सदनात त्यांनी कार्यभार सुरू केला असून जन संपर्क साधण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करून देण्यात आला आहे.Abhishek jadhav

 belgaum

अभिषेक जाधव यांनी गेली दोन वर्षे केंद्रीय अर्थ राज्य मंत्री भागवत कराड यांचे सल्लागार म्हणून काम केले आहे त्या अगोदर पाच वर्षे दिल्लीत माजी खासदार झी मिडिया ग्रुपचे सुभाष चंद्रा यांचे बिजनेस मीडिया आणि मनोरंजन विभाग प्रमुख म्हणून कार्य केले आहे.

अभिषेक जाधव केळकर बाग बेळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता जाधव यांचे चिरंजीव आहेत. महाराष्ट्र शासनाचे दिल्लीतील समन्वय साधताना बेळगावशी संबंधित कामकाजात त्यांची मदत मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.