Wednesday, April 24, 2024

/

बेळगाव मराठा सेंटरतर्फे 25 जूनपासून अग्नीवीर भरती

 belgaum

बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे आजी-माजी सैनिकांच्या मुलांसाठी येत्या 25 जून ते 1 जुलै 2023 या कालावधीमध्ये अग्नीवीर भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. अग्निवीर जनरल ड्युटी (जीडी), अग्नीवीर ट्रेडमन, क्लार्क, स्टोअर किपर टेक्निकल या पदांसाठी ही भरती होईल.

बेळगावातील मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर येथे 25 जून 2023 पासून अग्नीवीर भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. 1 जुलैपर्यंत ही भरती प्रक्रिया चालणार असून वेगवेगळ्या विभागांतर्गत वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.

अग्निवीर जीडीसाठी दहावी उत्तीर्ण किमान 45 टक्के गुण तसेच वाहन परवाना असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तर अग्नीवीर क्लार्क व स्टोअर कीपरसाठी पीयूसी उत्तीर्ण व किमान 60 टक्के गुण आवश्यक आहेत. याशिवाय खेळाडूंसाठी विशेष सवलत देण्यात येणार आहे.

 belgaum

25 जून रोजी स्क्रीनिंग ऑफ आऊटस्टँडिंग स्पोर्ट्समन अग्नीवीर जनरल ड्युटी संपूर्ण भारतात सर्व जातींसाठी आदींसाठी भरती होईल. तर 26 रोजी अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव कोल्हापूर,

लातूर, मुंबई आदी विभागांसाठी 26 रोजी प्रवेश दिला जाईल. 27 जून रोजी नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, पालघर, परभणी, पुणे,  रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे वर्धा, वाशिम आदी विभागांना स्थान दिले जाईल. भरतीसाठी दि. 28 रोजी मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांना संधी प्राप्त होईल.

तसेच दि. 30 रोजी स्क्रीनिंग ऑफ अग्नीवीर ट्रेड्समन अँड एक्स सर्विसमन यांना संधी असेल. 1 जुलै रोजी स्क्रीनिंग ऑफ अग्नीविर क्लार्क, स्टोअर किपर, टेक्निकल सर्विस अँड एक्स सर्विस मॅन जे मराठा लाईट इन्फंट्रीशी संलग्न आहेत अशा उमेदवारांसाठी भरती होईल. यासंबंधीची अधिक माहिती इंडियन आर्मीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.