belgaum

घरफोडी प्रकरणातील मुख्य संशयिताला बेड्या

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बैलहोंगल तालुक्यातील चिवटगुंडी येथे भरदिवसा झालेल्या मोठ्या घरफोडी कांडाचा छडा लावण्यात बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या पथकाला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला तात्काळ अटक करून त्याच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण ऐवज हस्तगत केला आहे.

बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिवटगुंडी येथील रहिवासी महांतेश बसप्पा बोगूर (वय २९) हे १२ जुलै २०२६ रोजी आपल्या कुटुंबासह घराला कुलूप लावून शेतात सोयाबीन पिकावर औषध फवारणीसाठी गेले होते. याच कालावधीचा गैरफायदा घेत अज्ञात चोरांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तिजोरीतील ५ लाख ४९ हजार रुपये किमतीचे ५८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ४८ हजार रुपयांची रोकड लांबवली होती. याप्रकरणी बैलहोंगल पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक के. रामराजन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आर. बी. बसरगी आणि बैलहोंगल उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. वीरय्या हिरेमठ यांच्या थेट मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद सी. यलगार यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तैनात करण्यात आले होते. या पथकातील प्रो. पीएसआय बसवराज जालापूर, एएसआय के. आर. इमानवर आणि तांत्रिक कर्मचारी सचिन पाटील यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी वेगाने तपास चक्रे फिरवून आरोपीचा माग काढला.

 belgaum

पोलिसांनी या घरफोडीप्रकरणी प्रकाश रायप्पा मुल्ला (वय ४०, रा. चिवटगुंडी, ता. बैलहोंगल) याला १६ जुलै २०२६ रोजी अटक केली. अटक केलेल्या आरोपीकडून गुन्ह्यातील ५ लाख ४९ हजार रुपये किमतीचे संपूर्ण ५८ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले असून, त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

अत्यंत कमी कालावधीत या क्लिष्ट गुन्ह्याचा छडा लावून मुद्देमाल जप्त करणाऱ्या बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी विशेष कौतुक केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.