belgaum

स्वतःच फोडले दुकान!सराफच निघाला आरोपी

0
 belgaum

बेळगाव लाईव्ह : खडेबाजारातील रामदेव गल्ली येथील व्ही. पी. वेरणेकर अँड सन्स या सराफा दुकानात चोरी झाल्याची तक्रार देणाऱ्या फिर्यादीनेच स्वतः दुकान फोडून चोरीचा बनाव रचल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. खडेबाजार पोलिसांनी संबंधित सराफ व्यावसायिकाला अटक करून त्याच्याकडून ₹65.95 लाखांचा सोन्या-चांदीचा ऐवज, रोख रक्कम आणि दुचाकी जप्त केली आहे.

पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी शनिवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, कृष्णानंद विश्वनाथ वेरणेकर (रा. सावरकर रोड, टिळकवाडी) यांनी 17 जुलै रोजी आपल्या रामदेव गल्लीतील दुकानाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार खडेबाजार पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला.

घटनास्थळाची पाहणी आणि तांत्रिक तपासादरम्यान फिर्यादीच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्यावेळी वेरणेकर यांनीच दुकानातील दागिने आणि रोख रक्कम काढून आपल्या लाल रंगाच्या अॅक्टिव्हा (KA-22/EW-4822) च्या डिकीत ठेवून नेल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

 belgaum

पोलिसांनी आरोपीकडून 519.8 ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत ₹62,60,990), 31 ग्रॅम चांदीचे दागिने (₹6,000), ₹2,83,010 रोख रक्कम आणि ₹45,000 किमतीची अॅक्टिव्हा असा एकूण ₹65,95,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलीस निरीक्षक एम. के. धामण्णावर, पीएसआय एस. आर. मुत्तत्ती, ए. बी. शेट्टी, संतोष बरगी, बी. एल. सर्वी, चन्नप्पा तेली, आरती हेग्गण्णा, सुनील चव्हाण, सदाशिव हलगिमनी, प्रकाश मादर तसेच फिंगरप्रिंट, तांत्रिक आणि SOCO पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. या पथकाच्या कामगिरीचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी कौतुक केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.