Friday, May 3, 2024

/

सुरक्षित प्रशासनासाठी भाजपाला बहुमत द्या : स्मृती इराणी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पक्षांचे स्टार प्रचारक ठिकठिकाणी उपस्थित राहून मतदारांना आवाहन करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज बेळगावमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी आल्या होत्या. हिंडलगा येथे ग्रामीण मतदार संघाचे भाजपचे उमेदवार नागेश मन्नोळकर यांच्या प्रचारार्थ आज त्यांनी जाहीर सभेत महिलांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना स्मृती इराणी म्हणाल्या, कोरोना काळामध्ये देश संकटात सापडलेला असताना पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी जनतेसाठी मोफत लस उपलब्ध करून दिली. मायमाऊलींना डोक्यावर हंडा घेऊन वणवण करावी लागू नये, यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावामध्ये घरात पाणी देण्याची योजना सरकारच्या माध्यमातून राबवली जातेय.

प्रत्येक जाती-धर्मातील व्यक्तींना चांगले जीवन जगता येण्यासाठी भाजप सरकारच्या माध्यमातून अनेक योजना राबवण्यात आल्या. आपला एक भाऊ प्रत्येक अडचणीत पाठीमागे खंबीरपणे उभा राहत असल्याने बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील महिला भगिनी नक्कीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार नागेश मनोळकर यांना विजयी करतील, असा विश्वास स्मृती इराणी यांनी व्यक्त केला.Smruti irani

 belgaum

त्या पुढे म्हणाल्या, कर्नाटक राज्यातील जनता टिपू सुलतानची जयंती साजरी करणाऱ्यांना कदापी मतदान करणार नाही. तर शिवाजी महाराजांच्या शिकवणीनुसार चालणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या मागे नक्कीच राहील. बेळगावमधील महिलांना कुणाला मतदान करायचे हे माहीत आहे. गेली ७० वर्षात लोकांच्या घरामध्ये स्वच्छ पाणी येत नव्हते, हे पुढील उमेदवार कधी सांगणार नाहीत. मात्र केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जलजीवन योजनेच्या माध्यमातून घराघरांमध्ये पाणी पोहचवले. महिलांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकारने अनेक कार्यक्रम हाती घेतले. त्यामुळे आगामी काळात देखील बेळगाव सह संपूर्ण कर्नाटक राज्याच्या विकासासाठी जनता डबल इंजिन सरकारला पूर्ण बहुमत येईल, असा विश्वास यावेळी स्मृती इराणी यांनी व्यक्त केला.

यावेळी बेळगाव जिल्हाध्यक्ष माजी आम. संजय पाटील, नागेश मनोळकर, ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनंजय जाधव, महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्ष सौ. चित्रा वाघ, ओबीसी मोर्चा सेक्रेटरी किरण जाधव, महिला मोर्चा अध्यक्ष (बेळगाव ग्रामीण) भाग्यश्री कोकितकर, उपमहापौर रेश्मा पाटील, नगरसेवक विना विजापुरे, हिंडलगा ग्रा. पं.चे माजी अध्यक्ष रामचंद्र मनोळकर, एससी मोर्चा ग्रामीण अध्यक्ष मल्लेश कोलकार यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि मतदारसंघातील महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.