Tuesday, April 30, 2024

/

ॲड. अमर येळ्ळूरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ

 belgaum

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या बेळगाव उत्तर मतदार संघातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांच्या जाहीर प्रचाराचा आज मंगळवारी मोठ्या उत्साहात शुभारंभ झाला.

श्री कपिलेश्वर मंदिर येथे समितीचे उमेदवार ॲड. अमर येळ्ळूरकर यांनी श्री कपिलनाथाचे विधिवत पूजन करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली.

ही प्रचार फेरी कपिलेश्वर रोड, तांगडी गल्ली, रामामेस्त्री अड्डा, महाद्वार रोड, संभाजी गल्ली, पहिला क्रॉस, मराठा गल्ली निम्मा भाग, तानाजी गल्ली, भांदूर गल्ली, तहसीलदार गल्ली, कांगले गल्ली, पाटील गल्ली, पाटील मळा मार्गे फिरून शनी मंदिर परिसरात समाप्त झाली. यावेळी समिती कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने प्रचाराला उपस्थित राहून महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार ॲड. अमर यळ्ळूरकर याना निवडून आणण्यासाठी चंग बांधल्याचे दाखवून दिले.

 belgaum

प्रचार फेरीत युवा  कपिल भोसले, प्रकाश चौगुले, सुनील बाळेकुंद्री, बंडू भातकांडे, रेणू किल्लेकर, सरिता पाटील, अनंत चौगुले, रेणू मुतकेकर, महेश मुतकेकर, प्रकाश शिरोळकर, प्रवीण तेजम, प्रसाद मरगाळे आदींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांचा सहभाग होता.Nourth mes

बेळगावमध्ये गेल्या 24 वर्षात समितीचे आमदार होऊ शकले नाहीत. मात्र यावेळी समितीचा आमदार निवडून येवू शकतो असे वातावरण आणि सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तर मतदार संघातील मराठी जनतेला मतदानाची उत्सुकता लागून राहिली आहे.

यावेळी बेळगाव शहराला समितीचा आमदार मिळून देऊन पुन्हा एकदा भगवा फडकविण्यासाठी आपण सज्ज असल्याचा इरादा लोकांमधून व्यक्त होत आहे. प्रचारफेरी दरम्यान गल्लोगल्ली ॲड. अमर येळ्ळूरकर यांची ओवाळणी करून माता भगिनींनी त्यांचे स्वागत केले. एकंदर शहरात समितीचा आमदार निवडून यावा असा निर्धार सर्व स्तरातून व्यक्त करण्यात येत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.