Tuesday, April 30, 2024

/

खानापुरात प्रशासनाकडून दडपशाहीचा प्रकार

 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव- खानापूर रस्त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे प्रचार कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयावर रीतसर परवानगी घेऊन महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यालयाचा फलक लावण्यात आला होता. यापूर्वीही या फलकावरून निवडणूक अधिकाऱ्यांनी गोंधळ निर्माण केला होता.

सलग तीनवेळा या फलकावरून आक्षेप घेत विविध कारणे पुढे करण्यात आली होती. यानंतर पुन्हा मंगळवारी प्रचंड पोलीस बंदोबस्तात निवडणूक अधिकाऱ्यांनी हा फलक काढून जप्त केला.

लोकशाही मार्गाने सार्वत्रिक निवडणूक सुरू असताना देखील मराठी व्देष्ट्या प्रशासनाची दडपशाही सुरूच असून रीतसर परवानगी घेऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संपर्क कार्यालयावर लावलेला मराठी फलक पोलीस बंदोबस्तात काढून जप्त करण्यात हल्ल्याची घटना आज मंगळवारी सकाळी खानापूर येथे घडली. यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने करत रस्त्यावर ठिय्या आंदोलन छेडले.Khanapur board

 belgaum

खानापूर रस्त्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीचे संपर्क कार्यालय आहे. या कार्यालयावर रीतसर परवानगी घेऊन मराठीतील फलक लावण्यात आला होता. यापूर्वी देखील तीन वेळा दमदाटी करून हा फलक काढण्याचा प्रयत्न निवडणूक अधिकाऱ्यांकडून झाला होता. मात्र आज प्रचंड पोलीस बंदोबस्तात निवडणूक अधिकाऱ्यांनी हा फलक काढून जप्त केला. त्यामुळे संतप्त झालेल्या समिती कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून तीव्र निषेध नोंदविला. रीतसर अधिकृत परवानगी घेऊन देखील अशा प्रकारची कारवाई करून नेहमीच गालबोट लावण्यात येत असते. हेतूता मराठी भाषिकांच्या भावना दुखावण्यात येत असतात. कन्नडीगांनी काहीही केले तरी चालते, मात्र बेळगाव सीमाभागात मराठी माणसाने परवानगी घेऊन फलक लावला तरी त्याच्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याच्या या प्रकाराबद्दल तीव्र निषेध केला जात आहे.

समितीच्या संपर्क कार्यालयावरील फलक आज काढण्यात येतात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली. प्रारंभी फलक काढण्यास अटकावा करताना कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले परवानगी पत्र दाखविले होते. मात्र निवडणूक अधिकारी अनुराधा वस्त्रद यांनी त्याकडे दुर्लक्ष करून फलक जप्त करण्याचा आदेश दिला. या प्रकारामुळे समिती कार्यकर्त्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे स्वखुशीने नव्हे तर कोणाच्यातरी दबावाखाली येऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी सदर कारवाई केल्याचे बोलले जात आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.