Thursday, March 28, 2024

/

बेळगावचा विकास सूर्यवंशी ‘मि. महाबला श्री’

 belgaum

कर्नाटक असोसिएशन ऑफ बॉडी बिल्डर्स च्या मान्यतेने शिवा मल्टी जिम गोकर्णतर्फे आयोजित कर्नाटक राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेतील मानाचा ‘मिस्टर महाबला श्री -2023’ हा किताब बेळगावच्या विकास सूर्यवंशी याने हस्तगत केला आहे. तसेच स्पर्धेतील ‘बेस्ट पोझर’ हा किताब बेळगावच्याच उमेश गंगणे याने पटकावला.

इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन मुंबईच्या (आयबीबीएफ) मान्यतेने आयोजीत मि. महाबला श्री -2023 ही राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धा गेल्या रविवारी रात्री मेन बीच गोकर्ण येथे उस्फूर्त प्रतिसादात यशस्वीरित्या पार पडली. सदर स्पर्धा 55 किलो ते 85 किलोवरील गट दरम्यानच्या एकूण आठ वजनी गटात घेण्यात आली.

स्पर्धेचे जेतेपद अर्थात मि. महाबला श्री -2023 किताब पटकाविणाऱ्या बेळगावच्या विकास सूर्यवंशी याला टायटल व करंडकासह 20 हजार रुपयांचे पारितोषिक प्रदान करण्यात आले, तर उमेश गंगणे याने बेस्ट पोझरसाठी असलेले 5 हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले.

 belgaum

स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी केएबीबीचे अध्यक्ष नीलकांत, सरचिटणीस जी. डी. भट, आयबीबीएफचे संयोजक सचिव अजित सिद्दणावर आदींच्या मार्गदर्शनाखाली शिवा मल्टी जिम गोकर्णच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

स्पर्धेच्या प्रत्येक गटातील पहिल्या पाच क्रमांकाचे विजेते शरीरसौष्ठवपटू पुढीलप्रमाणे आहेत. 55 किलो गट -मोहम्मद अरिफ मंगळूर, रोहन अलुर बेळगाव, सलमान खान शिमोगा, महांतेश बागलकोट, हेमंतकुमार पी. मडिवाळ कारवार. 60 किलो गट -उमेश गंगणे बेळगाव, रोनाल्ड डिसोजा मंगळूर, मंजुनाथ सोनटक्की बेळगाव, राघवेंद्र एम. गौडा कारवार, नितेश गोरील बेळगाव. 65 किलो गट -नितीन एम. एस. शिमोगा, निधी मंगळूर, ऋषभ वशिष्ठ रायचूर, संपत कुमार शिमोगा, मंजुनाथ बेंगलोर.Body building

70 किलो गट -प्रताप कालकुंद्रीकर बेळगाव, साहेबलाल विजापूर, फ्रान्सिस नाईक कारवार, सोमशेखर खारवी उडपी, संदीप उप्पार कारवार. 75 किलो गट -महेश गवळी बेळगाव, अफरोज ताशिलदार बेळगाव, श्रवणन एच. बेंगळूर, मोहसीन शेख कारवार, हुसेन सय्यद धारवाड. 80 किलो गट -शंकर होण्णावर कारवार, किशन शेट्टी मंगळूर, प्रवीण कणबरकर बेळगाव, दयानंद निलजकर बेळगाव, तपसकुमार नायक चित्रदुर्ग. 85 किलो गट -नित्यानंद कोटियन उडपी, जहर सिंग उडपी, काशिनाथ नायकर धारवाड,

राघवेंद्र नाईक कारवार, गणेशआनंद गौडा कारवार. 85 किलो वरील वजनी गट -विकास सूर्यवंशी बेळगाव, गौतम उडपी, संकेत मिष्ठा कारवार, राघवेंद्र एल. नाईक कारवार. मि. महाबली श्री -2023 किताब -विकास सूर्यवंशी (बेळगाव). फर्स्ट रनर अप -नित्यानंद कोटियन (उडपी). बेस्ट पोझर -उमेश गंगणे (बेळगाव).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.