Friday, April 26, 2024

/

काँग्रेस उमेदवारांची यादी लवकरच : डीकेशी

 belgaum

बेळगाव लाईव्ह : आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी एक ते दोन दिवसांत जाहीर केली जाईल, अशी माहित केपीसीसी प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १२० उमेदवारांचा समावेश असलेली पहिली यादी गुरुवारी दुपारी जाहीर होण्याची शक्यता आहे. सदर यादी बुधवारी जाहीर होणार होती. मात्र हि यादी लांबणीवर पडली आहे.

ज्या मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कमी विरोध आहे आणि ज्या मतदार संघात निवडणूक जिंकण्याची संधी अधिक आहे, त्या मतदार संघातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे. पहिल्या यादीत विद्यमान आमदारांचा समावेश असेल, अशीही माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.