रेल्वे खात्याचे पिंक बुक हे विविध कार्यक्रम किंवा प्रकल्प जे हाती घेण्यात आले आहेत अथवा हाती घेण्यात येणार आहेत यापासून बनलेले असते. पिंक बुकमध्ये भारतीय रेल्वेच्या विभिन्न सर्व विभागांची इतंभूत माहिती असते.
एकदा का रेल्वे अर्थसंकल्प जाहीर झाला की ‘पिंक बुक’ला विविध प्रकल्पांचे प्राथमिक कार्य सुरू करण्याचा अधिकार प्राप्त होतो. एखाद्या घोषणेने आपण वाहवत जात असतो, मात्र पिंक बुक पाहिल्यानंतर रेल्वे मंत्रालयाचा वास्तविक हेतू लक्षात येतो.
रस्ते सुरक्षा कामे -रोड ओव्हर /अंडर ब्रिजीस (आकडे हजार रुपयांमध्ये) : 1) लेव्हल क्रॉसिंग नं. 382 ऐवजी सबवेसह देसुर -बेळगाव रोड ओव्हर ब्रिज -5,00,00. 2) लेव्हल क्रॉसिंग नं. 383 ऐवजी 26 देसूर -बेळगाव रोड ओव्हर ब्रिज -2,00,00. 3) लेवल क्रॉसिंग नं. 381 ऐवजी बेळगाव -सांबरे रोड ओव्हर ब्रिज -50,00,00.
कित्तूर मार्गे बेळगाव -धारवाड नवा रेल्वे मार्ग (73.10 कि.मी.) अंबरेला वर्क पीबी#22/2019-20/एनआर 23-24 साठी परिव्यय प्रस्तावित -10,00,00. *1-3 हे मागील वर्षाच्या पिंक बुकमधील असून ते फक्त पुढे नेले आहेत.